Worlds longest nail woman : काय सांगता? तब्बल ३० वर्षांनंतर या महिलेनं कापली नखं'; लांबी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 20:10 IST2021-04-08T20:09:34+5:302021-04-08T20:10:41+5:30
Worlds longest nail woman : अयान्ना विलियम्सच्या नखांना मेनिक्योर करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागायचा आणि दोन बॉटल्स नेलपेंट लागायची.

Worlds longest nail woman : काय सांगता? तब्बल ३० वर्षांनंतर या महिलेनं कापली नखं'; लांबी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
जगातील सगळ्यात मोठी नखं असलेल्या महिलेनं जवळपास ३० वर्षानंतर आपली नख कापली आहेत. ह्यूस्टन, यूएसए (Houston, USA) ची रहिवासी असलेल्या अयान्ना विलियम्स (Ayanna Williams) या महिलेनं २०१७ मध्ये सगळ्यात मोठी नखं असल्याचा (world's longest fingernails) गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनवला होता. या महिलेची नखं १९ फूट लांब आहेत. सीएनएनच्या रिपोर्टनुसार अयान्ना विलियम्सच्या नखांना मेनिक्योर करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागायचा आणि दोन बॉटल्स नेलपेंट लागायची.
डॉक्टर एलिसन रिडिंग यांनी सांगितले की, त्यांनी एका ब्लेडच्या मदतीने अयान्ना यांची नखे कापली. त्यावेळी नखांची लांबी ७३३.५५ सेंटिमीटर अर्थात २४ फूट ०.७ इंच इतकी नोंदवण्यात आली. अयान्ना यांना किशोरवयीन वयांपासून नेलआर्ट करण्याचा छंद होता. नखांना पॉलिश करण्यासाठी अयान्नाला आईची परवानगी घ्यावी लागत होती. नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार
अयान्ना ३० वर्षानंतर नखे कापली असली तरी सर्वाधिक लांब नखांचा विक्रम अमेरिकेच्या ली रेमंडच्या नावावर आहे. लीच्या नखांची लांबी २८ फूट ४.५ इंच इतकी होती. अयान्ना विल्यम्सनं भावनिक निरोप घेत सांगितले की, "मी काही दशकांपासून माझे नखे वाढवत आहे, म्हणूनच मी एका नवीन जीवनासाठी तयार आहे. मी माझ्या मोठ्या नखांना खूप मीस करणार आहे.''सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले..