Video : आरारारारा खतरनाक! महिलेने साडी नेसून केला असा काही स्टंट, बघणारे बघतच राहिले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 12:47 IST2020-06-15T12:30:14+5:302020-06-15T12:47:05+5:30

@VarierSangitha नावाच्या यूजरने हा व्हिडीओ 13 जूनला ट्विटवर शेअर केला होता. याच्या कॅप्शनला लिहिण्यात आले आहे की, 'काय टॅलेन्ट आहे.

Women doing a backflip in saree video goes viral | Video : आरारारारा खतरनाक! महिलेने साडी नेसून केला असा काही स्टंट, बघणारे बघतच राहिले....

Video : आरारारारा खतरनाक! महिलेने साडी नेसून केला असा काही स्टंट, बघणारे बघतच राहिले....

जेव्हा इंटरनेटवरील लोकांना कुणाचं काही टॅलेन्ट आवडलं तर ती व्यक्ती रातोरात स्टार होते. अशी कितीतरी उदाहरणे बघायला मिळालीत. सध्या एका महिलेचा एक स्टंट फारच चर्चेचा विषय ठरत आहे. त्याला कारणही तसंच आहे. ते कारण म्हणजे या महिलेने केलेली बॅक फ्लिप तिने साडी नेसून केलीये. तिचा हा भन्नाट स्टंट पाहून लोक थक्क झाले आहेत.

@VarierSangitha नावाच्या यूजरने हा व्हिडीओ 13 जूनला ट्विटवर शेअर केला होता. याच्या कॅप्शनला लिहिण्यात आले आहे की, 'काय टॅलेन्ट आहे. ना शूज, ना चांगली जागा आणि साडीत. बघा किती सुंदरपणे ती हातांवर लॅंड झालीये'.

आतापर्यंत तुम्ही अनेक एकापेक्षा भारी स्टंट करणारे लोक पाहिले असतील. पण अशाप्रकारे एका महिलेने चक्क साडी नेसून स्टंट केल्याचं कधी पाहिलं नसेल. हेच कारण आहे की, सोशल मीडियातील लोक या महिलेचं भरभरून कौतुक करत आहेत.

ही बातमी लिहेपर्यंत या महिलेच्या व्हिडीओला तब्बल 3 लाख 64 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. 18.9 हजार लाइक्स आणि 3.6 हजार रिट्विट मिळाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ बघाल तुम्हालाही नक्की आवडेल. कारण असा व्हिडीओ तुम्ही याआधी नक्कीच पाहिला नसेल.

अगडबम : लॉकडाऊनमुळे त्याला बनवलं शहरातील सर्वात 'वजन'दार व्यक्ती!

Video : तब्बल 3 महिन्यांनंतर भेटल्या दोन मैत्रिणी, व्हिडीओ पाहून लोकांचेही पाणावले डोळे!

Web Title: Women doing a backflip in saree video goes viral