महिलेने दुधात तयार केली Maggi, लोकांना आठवली 'सुर्यवंशम'ची खीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 14:21 IST2019-09-16T14:15:08+5:302019-09-16T14:21:43+5:30

मॅगीची एक अशी रेसिपी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे की, लोक ही रेसिपी पाहून हैराण झाले आहेत.

Women cook Maggie with milk twitter public shocked, video viral | महिलेने दुधात तयार केली Maggi, लोकांना आठवली 'सुर्यवंशम'ची खीर!

महिलेने दुधात तयार केली Maggi, लोकांना आठवली 'सुर्यवंशम'ची खीर!

मॅगी लहानांपासून मोठ्यांपर्यंत इतकी लोकप्रिय आहे की, कुठेही सहज मिळते. मॅगी लोक वेगवेगळ्या प्रकारे तयार करून खातात. काहींना प्लेन मॅगी पसंत आहे तर काहींना टोमॅटो, कांदा मटर टाकून चांगली लागते. काही लोक तर अंड्यासोबतही मॅगी तयार करतात. मात्र, सोशल मीडियात मॅगीची एक अशी रेसिपी व्हायरल झाली आहे, जी पाहून लोक हैराण झाले आहेत. या रेसिपीत मॅगी दुधात तयार केली असून ती चवीला गोड आहे.

Desi Gooner नावाच्या ट्विटर यूजरने या रेसिपीचा व्हिडीओ १२ सप्टेंबरला शेअर केला होता. त्याला त्याने कॅप्शन दिलं होतं 'मॅगीची बेस्ट रेसिपी'. हा व्हिडीओ ३ हजार लोकांनी लाइक केला तर ९४९ लोकांनी रिट्विट केलाय. यावर लोकांनी फारच मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या वाचल्यावर कुणालाही पोट धरून हसू येईल.

Web Title: Women cook Maggie with milk twitter public shocked, video viral