मॅगी प्रेमींनो, तुम्ही कधी दुधवाली मॅगी खाल्ली का? व्हायरल 'Video' पाहून डोक्याला हातच लावाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 15:25 IST2023-12-25T15:23:52+5:302023-12-25T15:25:14+5:30
दुधवाली मॅगी कशी तयार केली जाते? या दुधवाल्या मॅगीची अनोखी रेसीपी पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

मॅगी प्रेमींनो, तुम्ही कधी दुधवाली मॅगी खाल्ली का? व्हायरल 'Video' पाहून डोक्याला हातच लावाल
Viral Video : ‘बस दो मिनिट…’ मध्ये तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात सर्वांनीच पाहिली असेल. शिवाय तुमच्यापैकी प्रत्येकाला मॅगी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती माहित असतीलच. मसाला मॅगी, चीज मॅगी किंवा तडका मॅगी अशा नानाविध प्रकारच्या मॅगीचे प्रकार तुम्ही चाखले असतील. हे कमी की काय त्यात आता आणखी एक नवी रेसीपी खवय्यांच्या समोर आली आहे. दुधवाली मॅगी असं या रेसीपीचे नाव आहे. दुधवाली मॅगी बनवण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने दुधवाली मॅगी बनवण्याची साधी आणि सोपी ट्रिक सांगितली आहे. व्हिडीओमध्ये सांगितल्यानूसार सुरुवातीला एका भांड्यामध्ये दुध घेतले. दुध थोडे गरम झाल्यानंतर दुधाने भरलेल्या भांड्यात मॅगी टाकली. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अॅड करुन मॅगी खायची सवय असेल, तर तुम्ही त्यात आवडीनूसार भाज्या घालू शकता. आणि शेवटी त्यामध्ये मॅगी मसाला टाका. थोड्या वेळानंतर मिश्रण एकजीव केल्यानंतर गॅस बंद करा. अशा पद्धतीने दुधवाली मॅगी व्हिडीओमधील महिलेने झटपट रेडी केली आहे.
दरम्यान, व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत २.५ मिलियन लोकांनी पाहिला असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ -