घराच्या छतावर भांडी घासणाऱ्या महिलेचा साबणावर पाय पडला अन्...पाहा धक्कादायक VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 16:15 IST2024-06-26T16:15:16+5:302024-06-26T16:15:39+5:30
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

घराच्या छतावर भांडी घासणाऱ्या महिलेचा साबणावर पाय पडला अन्...पाहा धक्कादायक VIDEO
Viral Video : कर्नाटकची राजधानी बंगळुरुतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हेब्बल परिसरात राहणारी 24 वर्षीय महिला घराच्या छतावर भांडी घासत होती. यावेळी तिचा पाय साबणावर पडला आणि ती थेट खाली जमिनीवर कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Two Minutes Of Terror In Woman Falls From Bengaluru Balcony
— RT_India (@RT_India_news) June 25, 2024
The 24-yr-old slipped on soap & clung to her husband before falling 3 floors.
She is in hospital in a stable condition. pic.twitter.com/AYE6A1Ohzs
सविस्तर माहिती अशी की, रुबाया नावाची महिला घराच्या छतावर भांडी घासत होती. यावेळी तिचा पाय साबणावर पडला आणि तोल जावून ती पॅराफीट वॉलवर लटकली. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला छतावर लटकलेली दिसत आहे, तर तिचा पती तिला वर खेचण्याचा प्रयत्न करतोय. महिला आपला जीव वाचवण्यासाठी बरीच धडपड करते, पण अखेर तिचा हात सुटतो आणि ती तिसऱ्या मजल्यावरुन खाली उभ्या असलेल्या दुचाकींवर पडते.
महिला रुग्णालयात दाखल
सुदैवाने महिला खाली पडल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. महिलेच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आहे, पण तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अधिक तपास सुरू केला आहे. महिला चुकून पडली की, तिला ढकलण्यात आले, याचा तपास केला जात आहे.