Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:33 IST2025-10-07T12:32:08+5:302025-10-07T12:33:04+5:30
रॅपिडोवर बाईक बुक केल्यानंतर लोकेशनवर पोहोचल्यानंतर पैसे दिले जातात. याच दरम्यान छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे.

Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
रॅपिडोवर बाईक बुक केल्यानंतर लोकेशनवर पोहोचल्यानंतर पैसे दिले जातात. याच दरम्यान छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, पैसे द्यायला लागू नये म्हणून राईड संपल्यानंतर महिला सर्वात आधी रॅपिडो रायडरशी वाद घालते आणि नंतर त्याच्याच डोळ्यात मिरची पूड फेकते.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, एक रॅपिडो रायडर आणि एक महिला पैशांवरून वाद घालत आहेत. महिला रॅपिडोवाल्याला काहीतरी बोलते यानंतप रॅपिडो रायडरला राग अनावर होतो आणि तो अपशब्द वापरतो. त्यानंतर, ती महिला त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकते आणि बाईकवर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करते. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
@indians या हँडलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या रीलच्या कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, ही घटना छत्तीसगडमधील बिलासपूर येथे घडली. महिलेने बाईक टॅक्सी बुक केली होती. लोकेशनवर पोहोचल्यावर तिने भाडं देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा रायडरने पैसे देण्याचा आग्रह धरला तेव्हा तिने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.
महिलेच्या या धक्कादायक कृतीमुळे रॅपिडो रायडरच्या डोळ्यांना त्रास झाला. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही इंटरनेट युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. २७ लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि ६० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर पोस्टला ८०० हून अधिक कमेंट्स देखील आल्या आहेत.