VIDEO : Pizza Hut कर्मचाऱ्यावर महिलेने फेकला पिझ्झा, पुढे काय झालं ते बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 11:51 IST2021-04-02T11:50:54+5:302021-04-02T11:51:27+5:30

हा व्हिडीओ ट्विटर अकाउंट शेड्स ऑफ व्हे द्वारे पोस्ट करण्यात आला आहे. यात पिझ्झा हट कर्मचारी महिला ग्राहकावर ओरडताना दिसत आहे.

Woman threw pizza at pizza hut employee then employees did something see video | VIDEO : Pizza Hut कर्मचाऱ्यावर महिलेने फेकला पिझ्झा, पुढे काय झालं ते बघा...

VIDEO : Pizza Hut कर्मचाऱ्यावर महिलेने फेकला पिझ्झा, पुढे काय झालं ते बघा...

रेस्टॉरन्टमधील भांडणाच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका पिझ्झा हट कर्मचाऱ्याने एका महिला ग्राहकासोबत बाचाबाची करताना दिसत आहे. तिथे असलेल्या एका ग्राहकाने ही घटना कॅमेरात कैद केली आणि हा व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट केला. 

हा व्हिडीओ ट्विटर अकाउंट शेड्स ऑफ व्हे द्वारे पोस्ट करण्यात आला आहे. यात पिझ्झा हट कर्मचारी महिला ग्राहकावर ओरडताना दिसत आहे आणि त्याच्यावर लटकलेल्या लॅपलाही दाखवण्यात आलेलं आहे. कर्मचारी मागे सरकतो आणि किचनमध्ये जाऊ लागतो. तेव्हा महिलाही त्याच्या मागे जाऊ लागते. तेथील दुसरा एक कर्मचारी तिला मागे जाण्यास सांगतो.

कर्मचारी आणि महिलेने एकमेकांवर पिझ्झा फेकण्याचाही आरोप लावला आहे. कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, 'माझ्याकडे जळाल्याचे निशाण आहेत'. हा व्हिडीओ सुरूवातीला पाहिला तर असं लक्षात येतं की, महिलेने काही फेकलं आहे जे लॅपमुळे पूर्णपणे दिसत नाही. 

रागात महिला पाय आपटू लागली आहे आणि तिने पिझ्झा पुन्हा तयार करण्यास सांगितले. मात्र, कर्मचाऱ्याने यास नकार दिला. तो महिलेला पिझ्झा हटच्या कॉर्पोरेट नंबरवर फोन करण्यास सांगतो. या भांडणामागचं कारण काय होतं हे समजू शकलं नाही. तेच हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी महिलेला पिझ्झा हटच्या कर्मचाऱ्याला त्रास देण्यासाठी दोषी मानलं आहे.
 

Web Title: Woman threw pizza at pizza hut employee then employees did something see video