महिला सैनिकांनी बंदुकीचा उपयोग करुन शिजवलं जेवणं, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 19:10 IST2021-10-01T19:09:26+5:302021-10-01T19:10:42+5:30
किचनमधली कोणतीही समस्या असो पण महिलांकडून एकापेक्षा एक जुगाड करुन त्याचे समाधान मिळवले जाते. देशाच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करणाऱ्या महिला सैनिकही यामध्ये मागे नाहीत. काहीच नाही मिळाले म्हणून चक्क त्यांनी बंदुकीचा उपयोग करु स्वयंपाक शिजवला. कसा? पाहा व्हिडिओ

महिला सैनिकांनी बंदुकीचा उपयोग करुन शिजवलं जेवणं, व्हिडिओ पाहुन होईल थरकाप
महिला पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभ्या राहिल्या तरी स्वयंपाकाच्या बाबतीत त्यांचा हात कुणीच धरु शकत नाही. किचनमधली कोणतीही समस्या असो पण महिलांकडून एकापेक्षा एक जुगाड करुन त्याचे समाधान मिळवले जाते. देशाच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करणाऱ्या महिला सैनिकही यामध्ये मागे नाहीत. काहीच नाही मिळाले म्हणून चक्क त्यांनी बंदुकीचा उपयोग करु स्वयंपाक शिजवला. कसा? पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठऱला आहे. यामध्ये दोन महिला सैनिक दिसत आहेत. या महिलांनी आपल्या चेहऱ्याला झाकून घेतले आहे. तसेच त्यांच्यासमोर एक कुकर दिसत आहे. या कुकरमध्ये अन्न शिजत असल्याचं दिसतंय. अन्न शिजवताना मात्र एक अडचण निर्माण झाली आहे. या कुकरला शिट्टी नसल्यामुळे त्यांना जेवण तयार करण्यास उशीर होत आहे. शेवटी याच महिला सैनिकांनी एक जबरदस्त जुगाड केलं आहे.
या महिला सैनिकांनी त्यांच्याजवळ असलेली बंदुकीचा वापर शिट्टी म्हणून केला आहे. एका महिला सैनिकाने बंदुक थेट कुकरवर ठेवली आहे. तसेच दुसऱ्या महिलेने वाफ बाहेर जाऊ नये म्हणून कापडाच्या मदतीने कुकर झाकून घेतले आहे. तसेच व्हिडीओतील दोन्ही महिलांनी त्यांचा चेहरासुद्धा झाकून घेतलाय.
महिला सैनिकांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. एका बंदुकीचा शिट्टी म्हणून वापर केल्यामुळे सैनिकांनी लावलेल्या जुगाडाची चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअरसुद्धा केले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हाला इन्स्टाग्रामवर jugaadu_life_hacks या अकाऊंटवर पाहता येईल.