ही महिला घरकाम करायला नवऱ्याला पाठवते, दिवसाला कमावते २३ हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 20:21 IST2022-11-16T20:18:43+5:302022-11-16T20:21:32+5:30
ब्रिटेन मध्ये राहणारी एक महिला चक्क आपल्या नवऱ्याला घरकामासाठी पाठवते. ऐकून आश्चर्य वाटले असेल हे नक्की काय प्रकरण आहे.

ही महिला घरकाम करायला नवऱ्याला पाठवते, दिवसाला कमावते २३ हजार
ब्रिटेन मध्ये राहणारी एक महिला चक्क आपल्या नवऱ्याला घरकामासाठी पाठवते. ऐकून आश्चर्य वाटले असेल हे नक्की काय प्रकरण आहे. तर ३८ वर्षांची लॉरा तिचिया नवऱ्याला दुसऱ्यांच्या घरी छोटे मोठे काम करायला पाठवते. याचे ती प्रतितास ३७०० रुपये घेते.
लॉरा ला तीन मुलं आहेत. आपल्या नवऱ्याला कामावर पाठवण्याची कल्पना तिला एक पॉडकास्ट ऐकून आली. तिचा नवरा जेम्स हा पेंटिंग, सजावट, टाइलिंग सारखे कामं करतो. एखाद्या घरी पूर्ण दिवस काम केले तर त्याला २३ हजार रुपये मिळतात. या कल्पनेमुळे लोक हसतील , टर खेचतील असे लॉरा ला वाटले होते. पण तिला पहिल्याच दिवशी एक क्लाएंट मिळाला. यानंतर त्यांना आठवड्यातुन ६ दिवस काम सुरु केले. नोव्हेंबरचे अर्धे दिवस पूर्ण बुक असल्याचे तिने सांगितले.
या कपलला वाटले नव्हते त्यांचा व्यवसाय इतका चालेल. ख्रिसमस ला घरी जाऊन लाईट इंस्टॉल करण्याचे कामही त्यांनी सुरु केले. जेम्स याआधी वेयरहाऊस मध्ये काम करत होता. मात्र त्याने नोकरी सोडली. यांच्या तीन मुलांपैकी २ मुलं ऑटिझमने ग्रस्त आहेत.