आश्चर्यकारक! फक्त स्तनांमधून नाही तर काखेतूनही बाहेर येऊ शकतं दूध; महिलेनं शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 18:07 IST2021-02-15T17:55:33+5:302021-02-15T18:07:28+5:30
Shoot breast milk out f her armpit video : या महिलेने केवळ तिच्या शरीराद्वारे करता येणाऱ्या विचित्र गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिले नाही तर ती कशा पद्धतीनं करते हे देखील दर्शविले.

आश्चर्यकारक! फक्त स्तनांमधून नाही तर काखेतूनही बाहेर येऊ शकतं दूध; महिलेनं शेअर केला व्हिडीओ
सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपला डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. असाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्तनपान करणार्या आईने हे उघड केले आहे की ती आपल्या काखेतून दूध (breast milk) काढण्यास सक्षम आहे. या महिलेने केवळ तिच्या शरीराद्वारे करता येणाऱ्या विचित्र गोष्टीबद्दल स्पष्टीकरण दिले नाही तर ती कशा पद्धतीनं करते हे देखील दर्शविले. कोट्यावधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून टिकटॉकवरून @ollieoooop हा व्हिडीओ फॉलोअर्ससह शेअर केला आहे.
@themeg_94's च्या व्हायरल पोस्टला प्रतिसाद म्हणून हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. व्हिडिओनंतर मिनिसोटा येथील तिनं मुलांच्या आईने आपल्या काखेच्या बाहेरुन आईचे दूध (breast milk) कसे काढू शकले याबद्दलचे एक संक्षिप्त स्पष्टीकरण दिले. काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक
त्या महिलेने समजावून सांगितले की, ''स्तनपान करणार्या मातांना 'पिट्ट्सी' नावाचे काहीतरी अनुभवायला मिळते. ज्यामुळे स्तनपान झाल्यावर सूज येते किंवा गाठीत वाढ होऊ शकते. साधारणपणे, तुमचे ब्रेस्ट टिश्यूज काखेतही असतात. अनेकदा त्यांना खाज येते. मला विशिष्ट गोष्टीबाबत जाणीव झाली. मी माझ्या काखेतून दूध काढू शकते आणि त्यानंतर मी ते सिद्धही केले,'' असे तिने आपला दावा व्यक्त करण्यापूर्वी सांगितले. देव तारी त्याला कोण मारी! मशिनमध्ये हात अडकून दोन भाग झाले; अन् डॉक्टरांनी केला असा चमत्कार