स्वतःवर मेंदूचे ऑपरेशन सुरू असताना महिलेने वाजवले व्हायोलिन; Video पाहून थक्क व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:47 IST2023-08-01T15:46:21+5:302023-08-01T15:47:01+5:30
हा वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वतःवर मेंदूचे ऑपरेशन सुरू असताना महिलेने वाजवले व्हायोलिन; Video पाहून थक्क व्हाल...
Viral Video: तुम्ही अनेकदा हॉस्पिटल आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेला असाल. तिथले वातावरण अतिशय गंभीर असते. आपल्या घरातला एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये भरती असेल किंवा त्याच्यावर एखादे ऑपरेशन होणार असेल, तर सगळेच टेन्शनमध्ये असतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये व्हायोलिन वाजवताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, जी महिला व्हायोलिन वाजवत आहे, तिच्यावर डॉक्टर मेंदूचे ऑपरेशन करत आहेत. या महिलेला भूल देण्यात आली नव्हती का, भूल दिली तर ही महिला व्हायोलिन कसे वाजवत आहे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील.
या व्हिडिओतील वृद्ध महिलेचे धाडस पाहून तुम्ही थक्क व्हाल. वृद्ध महिला तिच्या मेंदूच्या ऑपरेशनदरम्यान पूर्णपणे शुद्धीत असून व्हायोलिन वाजवत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, डॉक्टर महिलेच्या मेंदूवर सर्जरी करत आहेत आणि ही महिला ऑपरेशन थिएटरमध्ये व्हायोलिन वाजवत आहे. ही महिला व्हायोलिनच्या संगीतात पूर्णपणे तल्लीन झालेली दिसत आहे.
आतापर्यंत 1 लाख 92 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये महिलेने ज्याप्रकारे व्हायोलिन वाजवले, त्याचे बहुतांश युजर्सनी कौतुक केले.