बॉयफ्रेन्डच्या घरी ड्रेस विसरली होती तरूणी, बॉयफ्रेन्डचा आईचा कारनामा व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 14:37 IST2019-02-28T14:33:35+5:302019-02-28T14:37:54+5:30

सोशल मीडियात एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून तुम्ही हैराणही व्हाल आणि सोबतच तुम्हाला जोरदार हसूही फुटेल.

Woman leaves dress at ex boyfriend home finds his mom wearing it month later | बॉयफ्रेन्डच्या घरी ड्रेस विसरली होती तरूणी, बॉयफ्रेन्डचा आईचा कारनामा व्हायरल!

बॉयफ्रेन्डच्या घरी ड्रेस विसरली होती तरूणी, बॉयफ्रेन्डचा आईचा कारनामा व्हायरल!

सोशल मीडियात एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून तुम्ही हैराणही व्हाल आणि सोबतच तुम्हाला जोरदार हसूही फुटेल. हॅम्पशायरच्या २१ वर्षीय लिली हेंससोबत असं काही झालं, ज्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. 

लिली आणि तिच्या बॉयफ्रेन्डमध्ये काही दिवसांपासून सगळंकाही ठिक सुरू होतं. पण अचानक काही कारणांमुळे दोघांचे खटके उडू लागले आणि दोघांचं ब्रेकअप झालं. पण लिली तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या घरी एक महिन्यांआधी तिचा ब्लॅक ड्रेस विसरून आली होती. आता तर दोघांमध्ये ही काही बोलणंही होत नव्हतं. 

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लिलीचा बॉयफ्रेन्ड हा ती सोबत असतानाही दुसऱ्या एका मुलीला डेट करत होता. ज्यामुळे दोघांवर ब्रेकअपची वेळ आली. लिली आणि तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डमध्ये मजेदार वळण तेव्हा आलं जेव्हा लिलीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली.
असे सांगितले जात आहे की, लिली फेसबुक सर्फिंग करत होती. अचानक तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या आईचा फोटो तिच्या समोर आला. हा फोटो पाहून लिलीची बोबडी वळाली. एक महिन्यापूर्वी जो ड्रेस लिली एक्सच्या घरी विसरली होती, तोच ड्रेस त्याच्या एक्सच्या आईने परिधान केला होता.  

ट्विटरवर लिलीने ही घटना शेअर केली आणि ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. लिलीने ट्विटरवर एक्स बॉयफ्रेन्डच्या आईचा फोटो शेअर करत लिहिले की, ब्रेकअप होण्याआधी माझा ब्लॅक ड्रेस एक्सच्या घरीच राहिला होता. आता हा ड्रेस नाइट आऊटसाठी त्याची आई वापरत आहे. 


सर्वात मजेदार बाब म्हणजे पोस्ट व्हायरल झाल्यावर लिलीची पोस्ट व्हायरल झाल्यावर या पोस्टबाबच तिच्या एक्सच्या आईला सुद्धा खबर लागली. मग लिलीच्या एक्सच्या आईने फेसबुकवर कमेंट करत लिहिले की, 'अरे ही तर मी आहे. पण मला हा ड्रेस आवडला. १९ ते २० वर्षांच्या मुलीचा ड्रेस मला फिट झाला. मी किती छान दिसत आहे. मग त्यावरही लिलीने काहीतरी कमेंट केली की, तुमच्या मुलाने ज्या मुलीला सोडलं तिचा हा ड्रेस आहे. 

सोशल मीडियात लिली आणि लिलीच्या एक्स-बॉयफ्रेन्डची आई कॅरोलीन इस्टवूड यांच्यातील या टोमणेगिरीची यूजर्स मजा घेत आहेत. कुणी ही स्टोरी गंमतीत घेत आहे तर कुणी हैराण झालंय की, मुलाच्या आईने असं का केलं?

Web Title: Woman leaves dress at ex boyfriend home finds his mom wearing it month later