Viral Video: 'लाच' घेत नव्हता पोलिसवाला, भर रस्त्यात महिलेनं केलं त्याला जबरदस्ती किस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 18:53 IST2021-08-24T18:41:29+5:302021-08-24T18:53:00+5:30
या व्हिडीओत महिला ट्रॅफिक पोलिसाला पैसे देण्याचा प्रयत्न करते. पण तो पैसे घेत नाही. अशात महिला भर रस्त्यात त्याला जबरदस्ती किस करताना दिसली.

Viral Video: 'लाच' घेत नव्हता पोलिसवाला, भर रस्त्यात महिलेनं केलं त्याला जबरदस्ती किस!
सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल जो बघून तुम्ही हैराणही व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल. तुम्ही अनेक लोकांना ट्रॅफिक पोलिसांना पैसे देताना पाहिले असेल. अनेकांना पैसे घेतानाही पाहिलं असेल. पण या केसमध्ये जरा भलतंच काहीतरी झालंय. या व्हिडीओत महिला ट्रॅफिक पोलिसाला पैसे देण्याचा प्रयत्न करते. पण तो पैसे घेत नाही. अशात महिला भर रस्त्यात त्याला जबरदस्ती किस करताना दिसली.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पोलिसवाल्याने एका महिलेला पकडलं आहे. स्वत:ला सोडवण्यासाठी किंवा प्रकरणी मिटवण्यासाठी महिला प्रयत्न करताना दिसत आहे. पण तिला त्यात काही यश मिळत नाही. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा काहीच होताना दिसत नाही तेव्हा महिला ट्रॅफिक पोलिसाच्या मागे लागते आणि त्याला धरून जबरदस्ती किस करते. हे बघून रस्त्यावरील लोक हैराण होतात.
महिलेचा आणि ट्रॅफिक पोलिसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ ghantaa नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्सही करत आहेत.