शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:20 IST

ट्रेनच्या दरवाजात उभं राहून अनेक जण रील बनवतात. कारण असं केल्याने तुम्हाला जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळू शकतात, परंतु जीवाला धोका निर्माण होता.

सध्या रीलची क्रेझ खूपच वाढली आहे. ट्रेनच्या दरवाजात उभं राहून अनेक जण रील बनवतात. कारण असं केल्याने तुम्हाला जास्त व्ह्यूज आणि लाईक्स मिळू शकतात, परंतु जीवाला धोका निर्माण होता. असाच एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये श्रीलंकेला गेलेली एक तरुणी देखील ट्रेनमध्ये असाच एक स्टंट करते. ज्याला तब्बल १०५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

ट्रेनच्या दरवाजात एक तरुणी उभी राहते. नंतर ती रीलसाठी दरवाजाला लटकते. हे करताना तिला फार आनंद होतो. याच दरम्यान तिचा हात सुटतो, ती हळूहळू खाली सरकते आणि पडते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती स्वतः सांगते की, जेव्हा ती ट्रेनच्या दरवाज्यात उभी असते तेव्हा अचानक तोंडावरच दरवाजा बंद होतो. ज्यामुळे ती खाली पडते. पण तितक्यातच ट्रेन थांबल्याने तरुणीचा जीव वाचतो.

अवघ्या काही सेकंदांच्या या छोट्या क्लिपमध्ये ही तरुणी खूप मजा करताना दिसत आहे. ट्रेनमधील प्रवासाचा पुरेपूर आनंद घेते. इन्स्टाग्रामवर @munevvernizam नावाच्या एका युजरने या रीलच्या कॅप्शनमध्ये श्रीलंकेची आयकॉनिक ट्रेन आणि खूप खास प्रवास असं कॅप्शन दिलं आहे. 

या रीलला आतापर्यंत ८ लाख २६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ३ मे रोजी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या रीलला १०५ मिलियन म्हणजेच सुमारे १० कोटी ५० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओ पाहून अनेकांना तरुणींवर टीका केली आहे. जर ट्रेन थांबली नसती तर रीलच्या नादात तिने केलेला हा स्टंट तिच्याच जीवावर बेतला असता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ