पतीच निघाला आपल्या मेहुण्यांचा पिता, तब्बल २२ वर्ष सुरू होतं सासू आणि जावयाचं अफेअर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:18 IST2026-03-13T16:18:15+5:302026-03-13T16:18:54+5:30

Viral News : महिलेने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर केला. महिलेची पोस्ट वाचून लोकही अचंबित झाले.

Woman found husband was secretly her mother lover for 22 years | पतीच निघाला आपल्या मेहुण्यांचा पिता, तब्बल २२ वर्ष सुरू होतं सासू आणि जावयाचं अफेअर...

पतीच निघाला आपल्या मेहुण्यांचा पिता, तब्बल २२ वर्ष सुरू होतं सासू आणि जावयाचं अफेअर...

Viral News : आयुष्य हे एखाद्या धक्कातंत्रासारखं असतं. जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात. कधी कधी तर अशा गोष्टी समोर येतात, ज्यांची कधी आपण कल्पनाही केलेली नसते. एका ४० वर्षीय महिलेसोबत देखील असंच काहीसं झालं. ज्या पतीसोबत ती तिच्या जीवनातील २२ वर्ष राहिली, त्याच्याबाबत तिला असं काही समजलं की, तिच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेला समजलं की, तिच्या पतीचं तिच्या आईसोबत अनेक वर्षांपासून अफेअर होतं. एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभावी अशी घटना आहे. महिलेने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर केला. महिलेची पोस्ट वाचून लोकही अचंबित झाले. कारण ही घटना केवळ अफेअरची नव्हती, तर कुटुंबातील नात्यांना गुंतवणारी होती. 

अचानक घरी आली आणि...

महिला सात महिन्यांची गर्भवती होती आणि एका ट्रिपहून ती अचानक घरी परत आली. महिलेला जराही अंदाज नव्हता की, घरी आल्यावर असं काही बघायला मिळेल, ज्याने तिचं पूर्ण आयुष्यच बदलून जाईल. ती जेव्हा बेडरूममध्ये पोहोचली तेव्हा तिला तिचा पती तिच्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आला. महिला सांगते की, तो क्षण मेंदू सुन्न करणारा होता. सगळ्यात धक्कादायक तर हे होतं की, तिच्या आईला या गोष्टीची लाज वाटण्याऐवजी ती मुलीवरच ओरडू लागली होती आणि तिला बाहेर जाण्यास सांगत होती. हा सगळा प्रकार पाहिल्यावर तिला काही कळेना की, विश्वास कुणावर ठेवावा.

कधीपासून सुरू होतं सासू - जावयाचं अफेअर?

जेव्हा महिलेला पतीकडून सत्य समजलं तेव्हा ती आतून पूर्णपणे हलली. पतीने सांगितलं की, दोघांचं हे नातं तेव्हारपासून सुरू होतं, जेव्हा तो १८ वर्षांचा होता. म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच सासू आणि जावयाचं अफेअर सुरू होतं. हे ऐकल्यानंतर महिलेला आपल्या परिवाराच्या अनेक जुन्या गोष्टी आठवू लागल्या. तिने तिच्या बहीण - भावांच्या जुन्या घटनाक्रमांना जोडणं सुरू केलं. जसजसा ती हिशेब लावत गेली, तसतसं भयाण सत्य समोर येत गेलं.

जेव्हा महिलेच्या सगळं सत्य लक्षात आलं तेव्हा ती मनाने पूर्ण कोसळली होती. ज्या जुड्या भावांना आणि एका लहान भावाला ती भाऊ समजत होती, ते मुळात तिचा पती आणि तिच्या आईच्या संबंधातून जन्माला आलेले होते. म्हणजे ज्या भावांना ती लाडाने मांडीवर खेळवत होती ती तिच्या पतीची मुलं होती. इतकंच नाही तर महिला आणि तिची आई दोघीही एकाच आठवड्यात एकाच व्यक्तीकडून गर्भवती झाल्या. 

सत्य समोर आल्यावर काय झालं?

हे हादरवून सोडणारं सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा महिलेने गप्प बसण्याऐवजी हे सगळ्यांना सांगण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या वडिलांना सगळं सांगितलं. वडिलांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली होती. हे सगळं ऐकून त्यांनाही धक्का बसला. कारण पत्नीने पतीला आणि आपल्या मुलीला दगा दिला होता. महिलेने हिंमत दाखवत परिवारातील सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि सगळ्यांसमोर आपली आई आणि पतीचं सत्य सांगितलं. आता महिलेने पतीकडून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

Web Title : पति निकला पत्नी के भाई-बहनों का पिता: सास-दामाद का 22 साल पुराना अफेयर उजागर

Web Summary : एक महिला को शादी के 22 साल बाद पता चला कि उसके पति का उसकी माँ के साथ दशकों से अफेयर चल रहा था। चौंकाने वाली बात यह है कि उसके छोटे भाई-बहन उसकी माँ के साथ उसके पति के बच्चे थे। धोखा खाई पत्नी अब तलाक की मांग कर रही है।

Web Title : Husband Fathered Wife's Siblings: Mother-in-Law, Son-in-Law's 22-Year Affair Exposed

Web Summary : A woman discovered her husband's decades-long affair with her mother after 22 years of marriage. Shockingly, her younger siblings were revealed to be her husband's children with her mother. The betrayed wife is now seeking a divorce.