शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बंजी जंपिंग तिच्या आयुष्यात ठरला शेवटचा खेळ, ८० फुटांवरुन खाली कोसळुन महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:11 IST

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक महिला अ‍ॅडवेंचर खेळ खेळते. पण तिला कल्पनाही नसते की पुढे काय वाढुन ठेवलंय...

अनेक लोकांनी अ‍ॅडवेंचर गेम्स (Adventure Games) खेळायला भरपूर आवडतात. मात्र हेच खेळ काहीवेळा जीवावरही बेतू शकतात. अशा खेळांदरम्यान मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक महिला अ‍ॅडवेंचर खेळ खेळते. पण तिला कल्पनाही नसते की पुढे काय वाढुन ठेवलंय...

कजाकिस्तानमध्ये (Kazakhstan) राहणारी ३३ वर्षीय येवजीनिया लिओन्तिया तीन मुलांची आई होती. दोन तिची मुलं होती तर तिसरा तिच्या नातेवाईकांचा मुलगा होता. ज्याचा सांभाळ तिच करायची. येवजीनिया आपल्या पती आणि मित्रांसोबत कारागांडा शहरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. याच्या छतावर बंजी जंपिंग (Bungee Jumping) अ‍ॅडवेंचर गेम खेळला जातो. यात व्यक्तीच्या कमरेला रश्शी बांधली जाते आणि यानंतर या व्यक्तीला उंचावरून खाली सोडलं जातं. यानंतर व्यक्ती हवेतच या रस्सीच्या सहाय्याने लटकत राहातो. येवजीनियाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती उंचावर उभी असून बंजी जंपिंग करताना दिसते. मात्र, तिच्यासोबत मोठी दुर्घटना घडते.

मिळालेल्या माहितीनुसार, तिचा पती व्हिडिओ शूट करत होता. ती छतावर दोरी बांधून उभा होती. अचानक तिनं खाली उडी घेतली मात्र दोरी व्यवस्थित नसल्यानं हवेत लटकण्याऐवजी ती थेट जमिनीवर कोसळली आणि एका भिंतीला जाऊन धडकली. खाली उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. ती जखमी झालेली होती. लगेचच तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र सर्जरीदरम्यानच तिचा मृत्यू झाला.

या महिलेनं याआधीही अनेकदा बंजी जंपिंग केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्येच्या अँगलनंही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बंजी जंपिंगच्या ऑर्गनायजर्सविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की ही रश्शी कमजोर होती तर त्याकडे दुर्लक्ष  का केलं गेलं? उडी घेणाऱ्या व्यक्तीला दोन दोऱ्यांनी बांधलेलं असतं, मात्र यात एक दोरी तुटल्यानं ही मोठी दुर्घटना घडली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूबWomenमहिला