काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:09 IST2025-06-18T19:08:23+5:302025-06-18T19:09:17+5:30

पौराणिक कथेनुसार नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना देण्यासाठी हा मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येतो

Will something bad happen? Doomsday fish caught in fishermen's net in Tamilnadu | काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

Doomsday fish News: यावर्षी(2025) आतापर्यंत अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. जगभरातच नाही, तर भारतातही एकामागून एक धक्कादायक घटना घडत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला असो, अहमदाबाद विमान अपघात असो किंवा इतर अनेक घटना असो...ठराविक अंतराने काही ना काही विपरित घडत आहे. अशातच आता तामिळनाडूतील मच्छिमारांच्या जाळ्यात 'ओअरफिश' किंवा 'डूम्स डे फिश' सापडल्याने मोठ्या घटनांची शक्यता वर्तवली जात आहे. 

लोकांमध्ये भीती...
ओअरफिश हा खोल समुद्रात राहणारा, लांब आकाराचा आणि चकाकणाऱ्या शरीराचा दुर्मीळ मासा आहे. जपानी पौराणिक कथेनुसार या माशाला समुद्र देवाचा दूत मानले जाते. लोककथांनुसार त्याचं वर येणे, हे काहीतरी अघटित घडण्याची शक्यता दर्शवते. असे म्हटले जाते की, नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना देण्यासाठी हा मासा पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. आता हा मासा भारतीय मच्छिमारांच्या जाळ्यात सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे. या माशाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

चारवेळा दिसला डूम्स डे मासा
विशेष म्हणजे, या वर्षी मे महिन्यापासून चार वेळा हा मासा समुद्रकिनाऱ्यावर दिसला आहे. सोशल मीडियावर या माशाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे, आता कोणती आपत्ती येणार? असा प्रश्न विचारला जातोय. तामिळनाडूत सापडलेला मासा सुमारे 30 फूट लांब असून, व्हायरल व्हिडिओमध्ये 7 मच्छिमार त्याला हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे, जूनच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर दोन ओअरफिशचे मृतदेह आढळले होते. 

Web Title: Will something bad happen? Doomsday fish caught in fishermen's net in Tamilnadu