शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

हनीमूनहून परत येताच महिलेने केला घटस्फोट घेण्याचा विचार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:49 IST

महिलेने सांगितलं की, त्यांच्यात एक असा वाद झाला ज्यामुळे तिने परत आल्यावर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर जास्तीत जास्त जोडपी हनीमूनसाठी एखाद्या हिल स्टेशनला जातात. इथे दोघेही सोबत वेळ घालवतात आणि एकमेकांना जाणून घेतात. पण अनेकदा काही कपलमध्ये हनीमूनवरच वाद होतात. एका महिलेने नुकताच तिचा हनीमूनचा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितला. महिलेने सांगितलं की, त्यांच्यात एक असा वाद झाला ज्यामुळे तिने परत आल्यावर घटस्फोट घेण्याचा विचार केला. त्यांच्यात मतभेद एका अनोळखी तरूणीमुळे झाले होते, जी एकटीच फिरायला आली होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटचा ग्रुप r/TwoHotTakes वर महिलेने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि तिने लोकांकडे सल्ला मागितला की, ती योग्य करत आहे की नाही? महिलेने लिहिलं की, तिचं वय ३० आहे तर तिच्या पतीचं वय २९ आहे. नुकतंच त्यांचं लग्न झालं आणि ते हनीमूनहून परतही आले आहेत. तिथे त्यांना एक २७ वर्षीय तरूणी भेटली होती जी सोलो ट्रॅव्हलर होती. पती-पत्नी दोघेही या तरूणीला बघून इम्प्रेस झाले होते. अशात बोलता बोलता पतीने नंतर पत्नीला सांगितलं की, त्याने त्या तरूणीच्या काही इन्स्टाग्राम स्टोरीजना लाइक केलं आणि त्या स्टोरीजवर कमेंट्सही केल्या. तसेच त्याने तिला मेसेजही केले होते. दोघेही यावर नंतर फार काही बोलले नाही. दोघांनी त्यांचा हनीमून एन्जॉय केला आणि घरी परत आले.

घरी परत आल्यावर जेव्हा महिलेने पत्नीचे मेसेज चेक केले तर तिला एकही मेसेज दिसला नाही. तिच्या लक्षात आलं की, पतीने मेसेज डिलीट केले. यावर तिला प्रश्न पडला की, मेसेजमध्ये असं काय होतं की, पतीने ते डिलीट केले? तिने पतीला याबाबत विचारलं तर तो म्हणाला की, मेसेज इतके महत्वाचे नव्हते आणि पत्नीला वाईट वाटू नये म्हणून त्याने ते मेसेज डिलीट केले. याचं तिला फार वाईट वाटलं आणि घटस्फोट घेण्याचा विचार केला. तिला परीवार किंवा मित्रांना याबाबत सांगायचं नव्हतं. त्यामुळे तिने सोशल मीडियावर लोकांकडे सल्ला मागितला. लोकांनी सुद्धा तिला वेगवेगळे सल्ले दिले. एक तर म्हणाला की, तू पतीला हे सांग की, मला रेडिटवर डिलीट झालेले मेसेज कसे परत बघता येतात हे समजलं, मग पतीचे हावभाव बघ.

महिलेने आपल्या पोस्टमध्ये अपडेट करून आणखी पुढील माहिती दिली. महिलेने सांगितलं की, तिच्या पतीने अनेक वेळा तिची माफी मागितली. पण नंतर महिलेने त्या तरूणीला संपर्क केला आणि तिला सगळं प्रकरण सांगितलं. तिच्याकडून मेसेजही मागवून घेतले. तरूणीने त्यांचं चॅटिंग पाठवलं देखील. खरंच त्या मेसेजमध्ये फार काही नव्हतं. हाल-चाल विचारपूस इतकेच ते मेसेज होते. पण महिला या गोष्टीने चिंतेत आहे की, पतीने मेसेज डिलीट का केले. ती असंही म्हणाली की, हनीमून दरम्यान पतीने असं काहीच केलं नाही ज्यावरून तिला त्याच्यावर संशय येईल. तिथून परत आल्यावरच तिचा संशय वाढला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके