'आधी तू किती पुरूषांसोबत...', पतीनं पत्नीला प्रश्न विचारला, पाहा पतीच्या प्रश्नावर तिनं काय केलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:20 IST2025-12-20T13:58:05+5:302025-12-20T14:20:44+5:30
Husband Wife Viral News : एखादी व्यक्ती आपल्या भूतकाळातील काही गोष्टी पार्टनरला सांगण्यात कम्फर्टेबल नसते. असाच एक अनुभव एका महिलेने सोशल मीडियावर शेअर केला असून, तिने लोकांकडून सल्ला मागितला आहे.

'आधी तू किती पुरूषांसोबत...', पतीनं पत्नीला प्रश्न विचारला, पाहा पतीच्या प्रश्नावर तिनं काय केलं...
Husband Wife Viral News : सामान्यपणे पती-पत्नीमध्ये काहीही लपवाछपवी नसावी, असं म्हटलं जातं. दोघांनीही एकमेकांशी मोकळेपणाने सगळ्या गोष्टी शेअर करायला हव्यात. मात्र काही वेळा अशा परिस्थिती निर्माण होतात, जिथे एखादी व्यक्ती आपल्या भूतकाळातील काही गोष्टी पार्टनरला सांगण्यात कम्फर्टेबल नसते. असाच एक अनुभव एका महिलेने सोशल मीडियावर शेअर केला असून, तिने लोकांकडून सल्ला मागितला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मम्सनेटवर या महिलेच्या पोस्टमुळे नात्यातील विश्वास, प्रायव्हसी आणि वैयक्तिक लिमिटेशनवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोस्टनुसार, महिलेचा पती तिचा 'बॉडी काउंट' म्हणजे आतापर्यंत तिचे किती शारीरिक संबंध झाले आहेत, हे जाणून घेण्यासाठी अडून बसला आहे. मात्र ही माहिती शेअर करण्यात ती अजिबात सहज नाही.
पतीचा सततचा आग्रह
महिलेने सांगितले की तिचा पार्टनर वारंवार या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला तिने हा प्रश्न टाळला, पण अलीकडे पतीने तिला गंभीर चर्चेसाठी बसवले आणि लहानपणापासून आतापर्यंतचे सर्व अफेअर्स तपशीलवार सांगायला सांगितले.

वैयक्तिक आयुष्याची सीमा
पोस्टमध्ये महिलेने लिहिले आहे की, ती बराच काळ सिंगल होती आणि त्या काळात तिचे काही पुरूषांसोबत थोड्या थोड्या काळासाठी संबंध होते. मात्र या सगळ्यांची मोजदाद किंवा तपशील देणं तिला गरजेचं वाटत नाही. तिच्या मते, हा तिचा पूर्णपणे वैयक्तिक विषय आहे आणि प्रत्येकाला स्वतःच्या मर्यादा ठरवण्याचा अधिकार आहे.
महिलेचा आरोप आहे की, या मुद्द्यावरून तिच्या पतीचं वागणं तिला मानसिक त्रास देणारं ठरत आहे. ती स्वतःला अस्वस्थ आणि चिंतेत असल्याचं सांगते. इतकंच नाही तर पतीने तिच्याशी बोलणंही बंद केलं असून, “तुझ्यावर विश्वास ठेवता येत नाही” असं म्हणत तो दूर राहू लागला आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. अनेक युजर्स महिलेच्या बाजूने उभे राहत म्हणत आहेत की कोणत्याही नात्यात जबरदस्तीने वैयक्तिक माहिती मागणं चुकीचं आहे. विश्वास हा भूतकाळातील आकड्यांवर नाही, तर सध्याच्या वागणुकीवर आणि प्रामाणिकपणावर असायला हवा.
तर काही लोक पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून पाहत असून, नात्यात मोकळा संवाद महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त करत आहेत. एकूणच, या पोस्टमुळे नात्यांमधील विश्वास, गोपनीयता आणि सीमा यावर नवी चर्चा सुरू झाली आहे.