Santa Claus नेहमी पुरूषच का असतो? कधी केलाय का तुम्ही या गोष्टीचा विचार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:34 IST2025-12-24T14:32:49+5:302025-12-24T14:34:27+5:30
Interesting Facts : Santa Claus नेहमी पुरूषच का असतो, एखादी महिला किंवा मुलगी का नसते? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर...

Santa Claus नेहमी पुरूषच का असतो? कधी केलाय का तुम्ही या गोष्टीचा विचार?
Interesting Facts : सोशल मीडियाच्या या महाजाळात इतकी वेगवेगळी माहिती फिरत असते ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर इथे सहज मिळू शकतं. रोज हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात, पण त्यातील मोजकेच म्हणजे हटके असेच व्हिडीओ, उत्सुकता वाढवणारे किंवा लोकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देणारे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ काहीतरी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढवतात. असाच एक साधा पण तेवढीच उत्सुकता वाढवणारा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अनेकांच्या मनात येणारा असा प्रश्न विचारण्यात आला आहे. ज्याचं उत्तर व्हिडिओत नाही, पण आम्ही देणार आहोत.
आता जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एका तरूणाने एका व्यक्तीसमोर माइक धरून प्रश्न विचारला की, Santa Claus नेहमी पुरूषच का असतो? नक्कीच हा प्रश्न उत्सुकता वाढवणाराच आहे. पण व्यक्तीच्या उत्तराने पूर्ण व्हिडिओला कॉमेडीमध्ये बदललं. तो फार गंभीर हावभाव करत म्हणतो की, 'कारण सर कोणतीही मुलगी दरवर्षी सेम कपडे घालू शकत नाही. तेही त्याच उत्सवाला. कधीच नाही'. हा एक स्क्रीप्टेड फनी व्हिडीओ आहे, जो व्हायरल झाला आहे.
पण खरंच Santa पुरूषच का असतो?
खरंतर अनेकांच्या मनात Santa Claus हा पुरूषच का असतो? असा प्रश्न कधीना कधी येत असेलच. पाहुयात मग याचं उत्तर. तर सांताची जी कथा आहे ती चौथ्या शतकातील एका दयाळू बिशपची आहे. त्यावेळी एक सेंट निकोलस नावाची एक व्यक्ती होती आणि ती आपल्या दिलदारपणासाठी ओळखली जात होती. तो गपचूप लहान मुलांना आणि गरीबांना गिफ्ट देत होता. त्यांची मदत करत होता. त्यामुळे तो लहान मुलांचे संरक्षक बनले. बालपणीच निकोलसचे आई-वडील वारले आणि मागे सोडून गेले अमाप संपत्ती. या संपत्तीच्या मदतीने निकोलस आरामात जगू शकला असता. पण त्याने सेवेचा मार्ग निवडला. इथून सुरू झाला निकोलसचा सेंट निकोलस बनण्याचा प्रवास.
एकदा एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होती. त्याला तीन मुली होत्या. त्यांच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो आपल्या मुलींच्या चुकीच्या मार्गाला लावणार होता. हे निकोलसला समजलं. तो रात्री लपून गेला आणि त्याने या व्यक्तीच्या घराच्या खिडकीतून सोन्याच्या नाण्यांची एक पिशवी फेकली. सकाळी व्यक्तीला नाणी पाहून आनंद झाला. दुसऱ्या मुलीसाठीही निकोलसने अशीच लपून मदत केली. पण तिसऱ्या वेळी व्यक्तीने निकोलसला असं करताना पकडलं. तेव्हा व्यक्ती निकोलसच्या पायात पडला. तेव्हा निकोलसने एकच अट घातली, ती म्हणजे मदत मी केली हे कुलाही कळता कामा नये. इथून निकोलसला गिफ्ट देण्याची आयडिया आली आणि आपलं काम सुरू केलं.