ही कसली भलतीच फॅशन! नखावर लावलीय चहाची गाळणी, पाहा चहा गाळला जातोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 17:25 IST2021-12-09T17:24:56+5:302021-12-09T17:25:06+5:30

एका तरुणीनं आपल्या नखांचा वापर करून अशी काही कमाल केली आहे, की पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन तोंडात बोट घालत आहे.

What a perfect fashion! Tea strained on the nails, see if the tea is strained? | ही कसली भलतीच फॅशन! नखावर लावलीय चहाची गाळणी, पाहा चहा गाळला जातोय का?

ही कसली भलतीच फॅशन! नखावर लावलीय चहाची गाळणी, पाहा चहा गाळला जातोय का?

एका तरुणीनं स्वतःच्या नखांवर चहाचं गाळणं बनवून घेतलं आहे. हा प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून ही कमाल तरुणीनं कशी काय केली, याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत असतात. कुणी काही करामती करून दाखवतं, तर कुणी इतरांची फजिती करून लक्ष वेधून घेण्यात धन्यता मानतं. मात्र एका तरुणीनं आपल्या नखांचा वापर करून अशी काही कमाल केली आहे, की पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन तोंडात बोट घालत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत तरुणीच्या नखांवर स्ट्रेन नेल आर्ट साकारली जात असल्याचं दिसतं. अगोदर नखांच्या खाली असणाऱ्या रिकाम्या जागेत एक स्ट्रक्चर लावलं जातं. त्यानंतर चाळणीसारखा एक धातू त्यावर लावून तो स्ट्रेनरच्या साहाय्यानं खेचून बसवण्यात येतो. ही कृती पूर्ण झाल्यानंतर त्या रचनेला चहाच्या गाळण्याचं रूप येतं. मात्र हे चहाचं गाळणं केवळ दिखाऊ किंवा शो पुरतं नाही, तर प्रत्यक्षात त्याने चहा गाळणं शक्य आहे.

तरुणीनं या व्हिडिओत चहा गाळण्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवलं आहे. जेव्हा यातून चहा गाळला जातो, तेव्हा चहाची पूड, इलायची आणि इतर ऐवज नखाच्या गाळण्यात अडकून बसतो आणि गाळीव चहा खाली जातो. चहाच्या गाळण्यासाठी नखांचा वापर करण्याची ही कदाचित पहिलीच पद्धत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्याला आतापर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. दिवसेंदिवस या व्हिडिओला मिळणारी पसंती वाढत चालली असून अनेकजण हा प्रयोग करू लागले आहेत.

Web Title: What a perfect fashion! Tea strained on the nails, see if the tea is strained?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.