अद्भूत! आकाशातून अशी दिसते भारत-पाकिस्तान बॉर्डर, बघा न पाहिलेला शानदार नजारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 10:58 IST2021-02-10T10:54:45+5:302021-02-10T10:58:53+5:30

हे फोटो भारत-पाकिस्तान बॉर्डरचे आहेत. हे फोटो रात्रीच्या वेळी काढण्यात आले आहेत. यात तुम्हाला भारत-पाक बॉर्डर स्पष्टपणे दिसते.

This is what the India Pakistan border looks like at night from above | अद्भूत! आकाशातून अशी दिसते भारत-पाकिस्तान बॉर्डर, बघा न पाहिलेला शानदार नजारा!

अद्भूत! आकाशातून अशी दिसते भारत-पाकिस्तान बॉर्डर, बघा न पाहिलेला शानदार नजारा!

कधी विचार केला का की, भारत-पाकिस्तान बॉर्डर कशी दिसत असेल? ट्विटर यूजर @shukla_tarun ने विमानातून प्रवास करत असताना काढलेले काही शानदार फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्यानुसार, हे फोटो भारत-पाकिस्तान बॉर्डरचे आहेत. हे फोटो रात्रीच्या वेळी काढण्यात आले आहेत. यात तुम्हाला भारत-पाक बॉर्डर स्पष्टपणे दिसते.

हे फोटो @shukla_tarun ने ९ फेब्रुवारीला शेअर केले. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'लाहोर क्रॉस करून भारताच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करत आहे. भारत-पाकिस्तान बॉर्डर आकाशातून...काही दिवसांपूर्वी एका मित्राने हा जबरदस्त नजारा कॅमेरात कैद केला. विमानात प्रवास करण्याच आनंद!'.

हे ट्विट यूजर्सना चांगलंच आवडलं असून या ट्विटला दीडशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर १९ पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. सोबतच लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. कारण क्वचितच लोकांनी असा नजारा पाहिला असेल.
 

Web Title: This is what the India Pakistan border looks like at night from above