अरे देवा! पृथ्वीवर एका सेकंदात इतकं काय काय घडतं...चुकूनही कधी विचार केला नसेल या गोष्टींचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:30 IST2026-01-03T17:28:29+5:302026-01-03T17:30:45+5:30
What Happens Every Second On Earth : एका सेकंदात पृथ्वीवर इतकं काय काय घडतं ज्याचा आपण कधी विचार केला नसेल. पण हा प्रश्न खरंच इंटरेस्टींग आणि उत्सुकता वाढवणारा आहे. सोबतच याचं उत्तरही तेवढंच अवाक् करणारं असेल.

अरे देवा! पृथ्वीवर एका सेकंदात इतकं काय काय घडतं...चुकूनही कधी विचार केला नसेल या गोष्टींचा
What Happens Every Second On Earth : एका सेकंदात पृथ्वीवर काय घडतं? असा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? जर आपण प्रयत्न केला असेल आणि उत्तर मिळालं नसेल तर आज आम्ही आपल्यासाठी याचं उत्तर घेऊन आलो आहोत. ज्यावर आपल्याला विश्नास ठेवणं जरा अवघड जाणार आहे. कारण एका सेकंदात पृथ्वीवर इतकं काय काय घडतं ज्याचा आपण कधी विचार केला नसेल. पण हा प्रश्न खरंच इंटरेस्टींग आणि उत्सुकता वाढवणारा आहे. सोबतच याचं उत्तरही तेवढंच अवाक् करणारं असेल.
एका सेकंदात पृथ्वीवर अक्षरशः कोट्यवधी गोष्टी घडत असतात. आपल्याला जाणीवही नसते, पण प्रत्येक सेकंदात जीवन, तंत्रज्ञान, निसर्ग आणि अर्थव्यवस्था सतत हालचालीत असतात. चला पाहूया एका सेकंदात जगात काय-काय घडतं.
एका सेकंदात पृथ्वीवर काय काय घडतं?
आपल्याल कदाचित कल्पनाही नसेल की, एका संकेदात पृथ्वीवर सुमारे १०० वेळा विजांच्या कडकडाटासह वीज कोसळते. तसेच ४ नवीन बाळांचा जन्म होतो. २ लोक या जगाचा निरोप घेतात म्हणजे त्यांचा जीव जातो. तब्बल ४ मिलिअन ईमेल्स पाठवले जातात. तर ३ मिलियन टेक्स्ट मेसेजेस पाठवले जातात. सुमारे १०,००० ट्वीट्स पोस्ट होतात आणि १,००,००० पेक्षा जास्त गूगल सर्चेस होतात. इतकंच नाही तर जवळपास २३,००० कप कॉफी प्यायली जाते आणि सुमारे २५,००० टन कोकच्या बाटल्या उघडल्या जातात. तसेच अंदाजे ४०० पिझ्झा स्लाइस खाल्ले जातात.
पृथ्वीची प्रचंड वेगवान हालचाल
प्रकाश एका सेकंदात पृथ्वीभोवती सुमारे ७ फेऱ्या मारतो. पृथ्वी सूर्याभोवती ३० किलोमीटर प्रवास करते. एका सेकंदात एक भूकंप नोंदवला जातो. जगभरात एका सेकंदात सरासरी २ कार अपघात घडतात. मनु्ष्यांद्वारे १,२०० बॅरल तेल जाळले जाते. तर १,१०० टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडलं जातं.
एका सेकंदातील आर्थिक व सोशल अॅक्टिव्हिटी
Amazon आणि Walmart मिळून साधारण १५,००० डॉलर्स कमावतात. एलन मस्क यांच्या संपत्तीत ३,००० डॉलर्सची वाढ होते. तर सोशल मीडियावर पोस्ट्ना ५ मिलियनपेक्षा जास्त लाईक्स दिले जातात. आहे ना गंमत. एका सेकंदात पृथ्वीवर इतकं काही घडतं, ज्याची आपल्याला कल्पना देखील नसते. या तर केवळ काही मुख्य गोष्टी झाल्यात, अशा आणखी कितीतरी गोष्टी घडत असतील. ज्याची सुद्धा आपल्याला कल्पना नसेल.