VIDEO : बाइक स्टॅंडवर लावताना घडला असा विचित्र अपघात, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:02 IST2021-12-30T15:00:57+5:302021-12-30T15:02:55+5:30
Viral Video : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका डिलिवरी बॉय जेव्हा त्याची बाइक रस्त्याच्या कडेला लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यासोबत असं काही घडतं ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल.

VIDEO : बाइक स्टॅंडवर लावताना घडला असा विचित्र अपघात, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल...
जेव्हा आपलं नशीब चांगलं असतं तेव्हा आपल्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतात. पण जर नशीब चांगलं नसेल तर काहीही विचित्र घडतं. असंच काहीसं या व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओत बघायला मिळतं. एका डिलिवरी बॉय त्याची बाइक स्टॅंडवर लावत असताना असं कही घडतं की बघून असंच म्हणावं वाटेल की, नशीब चांगलं म्हणून तो वाचला.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका डिलिवरी बॉय जेव्हा त्याची बाइक रस्त्याच्या कडेला लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यासोबत असं काही घडतं ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. त्याच्यासोबत एक मोठा अपघात होणार याचा त्याला अंदाजही नसतो. तो जसा बाइक स्टॅंडवर लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जमिनीचा काही भाग खाचतो आणि बाइक खाली पायऱ्यांवर पडते.
पायऱ्यांच्या बाजूला असलेली बॉर्डर फार जुनी दिसत आहे आणि हा तरूण त्या पायऱ्यांवर बाइकसोबत पडणार होता. तेव्हाच तो दुसऱ्या बाजूला उडी घेत स्वत:ला वाचवतो. पण त्याची बाइक खड्ड्यात पायऱ्यांवर पडते. सुदैवाने तरूणाला या अपघातात काहीच होत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही चक्रावून जाल आणि हेच म्हणाल की, नशीब चांगलं होतं म्हणून तो वाचला.