VIDEO : नवरीने मंडपात दाखवले असे नखरे, पळून गेला नवरदेव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 14:03 IST2021-07-14T14:01:16+5:302021-07-14T14:03:26+5:30
एक लग्नातील व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतं की, हे लग्न करण्यासाठी नवरीची अजिबात इच्छा नाही.

VIDEO : नवरीने मंडपात दाखवले असे नखरे, पळून गेला नवरदेव!
भारतीय लग्नातील रितीरिवाज खूप पसंत केले जातात. त्यामुळेच सोशल मीडियावर (Social Media) अलिकडे लग्नातील कित्येक व्हिडीओ ट्रेन्ड होत असतात. असाच एक लग्नातील व्हिडीओ (Viral Marriage Video) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर हे लक्षात येतं की, हे लग्न करण्यासाठी नवरीची अजिबात इच्छा नाही.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी मंडपात खाली बसली आहे. लग्नाचे रितीरिवाज सुरू आहेत. भांगेत कुंकू भरतेवेळीच अचानक नवरी नखरे करू लागली. नवरीचा हा हट्टीपणा पाहून नवरदेव संतापला आणि तो मंडपातून पळून गेला. एक महिला नवरदेवाला समजावण्याचा प्रयत्न करते. पण नवरदेव काही ऐकत नाही. (हे पण बघा : इश्श्श्श! नवरीने मोठ्या उत्साहाने स्टेजवरच उघडलं लग्नाचं गिफ्ट, बघून इतकी लाजली की....)
या व्हायरल व्हिडीओत इतकाच ड्रामा नाही. नवरी अचानक बेशुद्ध होऊन खाली पडली. आता हे समजून येत नाहीये की ती खरंच बेशुद्ध पडली की लग्न करायचं नव्हतं म्हणून कारण शोधत होती. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम रील्सवर निरंजन महापात्राने शेअर केला आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत २२ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. या व्हिडीओवर येणाऱ्या कमेंटही मजेदार आहेत. काही लोक म्हणाले की,नवरी या लग्नाविरोधात आहे. तिला लग्नच करायचं नाहीये. तर काही म्हणाले की, तिला मिरगीचा झटका आला आहे. त्यामुळे तिला ठीक करण्यासाठी शूजचा वास द्या.