Video : रेल्वे ट्रॅकवर उभी होती 'ही' दृष्टीहीन महिला, अचानक आली ट्रेन आणि.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 16:12 IST2019-05-01T16:10:56+5:302019-05-01T16:12:21+5:30
मुंबईच्या रेल्वे स्टेशनांवर अनेकदा आपण धक्कादायक अपघातांचे व्हिडीओ बघत असतो. सोबतच अनेकदा कशाप्रकारे आश्चर्यकारकरित्या काही लोकांचा जीव वाचवला जातो हेही बघायला मिळतं.

Video : रेल्वे ट्रॅकवर उभी होती 'ही' दृष्टीहीन महिला, अचानक आली ट्रेन आणि.....
मुंबईच्या रेल्वे स्टेशनांवर अनेकदा आपण धक्कादायक अपघातांचे व्हिडीओ बघत असतो. सोबतच अनेकदा कशाप्रकारे आश्चर्यकारकरित्या काही लोकांचा जीव वाचवला जातो हेही बघायला मिळतं. स्पेनचा एक असाच व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एका पोलिसाने एका अंध तरूणीचा जीव वाचवला आहे.
एक अंध तरूणी ट्राम ट्रेनचा ट्रॅक क्रॉस करत होती. पण अचानक तिला काही कळेनासं झालं आणि ती ट्रॅकवरच उभी राहिली. अशातच एका बाजूने ट्रेन आली. ती आणखीन गोंधळली. अचानक तिच्या मागच्या बाजूने एक पोलीस धावत आला आणि त्याने तिला वेळीच ट्रॅकवरून बाजूला केला. एखाद्या सिनेमातील सीन वाटावी अशीच ही घटना घडली.
Villarejo Station चा हा व्हिडीओ आहे. तरूणी रस्ता पार करत होती. ती रस्त्याच्या मधोमध थांबली. वेळीच पोलिसाने तिचा जीव वाचवला. त्यामुळे सोशल मीडियातून या पोलिसाचं भरभरून कौतुक केलं जात आहे. हा पोलीस वेळीच धावून आला नसता तर कदाचित तरूणीचा अपघात झाला असता.