रात्री घरात येत होते अजब आवाज, बघितलं तर भींत तोडून घरात शिरला होता हत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:25 PM2021-06-21T17:25:47+5:302021-06-21T17:27:26+5:30

महिलेने सांगितलं की, रात्री अचानक घरात काही आवाज येत होते. जेव्हा उठून पाहिलं तर किचनमध्ये हत्ती आपल्या सोंडेने काही खायला मिळतं का हे शोधत होता.

Watch photo of wild hungry elephant who entered in kitchen after breaking wall to find food in Thailand house | रात्री घरात येत होते अजब आवाज, बघितलं तर भींत तोडून घरात शिरला होता हत्ती!

रात्री घरात येत होते अजब आवाज, बघितलं तर भींत तोडून घरात शिरला होता हत्ती!

Next

थायलॅंडच्या हुआ हिन जिल्ह्यात जंगली हत्तीच्या कारनाम्याची एक घटना समोर आली आहे. या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इथे एका जंगली हत्ती भूक लागल्यावर चक्क एका घराची भींत तोडून किचनमध्ये शिरला होता. इतकंच नाही तर त्याने खाण्यासाठी काही मिळतं का याचा शोधही घेतला.

Thaiger मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, घरच्या मालकीनीने किचनमध्ये पोहोचून या हत्तीचे फोटो-व्हिडीओही फेसबुकवर शेअर केले. महिलेने सांगितलं की, रात्री अचानक घरात काही आवाज येत होते. जेव्हा उठून पाहिलं तर किचनमध्ये हत्ती आपल्या सोंडेने काही खायला मिळतं का हे शोधत होता. महिलेने  थाई भाषेत हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रोज येतो'. (हे पण बघा : महिलेच्या ड्रेसवर चढला उंदीर आणि मग...; ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ)

हे प्रकरण समोर आल्यावर डिपार्टमेंट ऑफ नॅशनल पार्क, वाइल्डलाईफ अॅन्ड प्लांट कंझर्वेहशन सांगितलं की, लवकरात लवकर सरकारी एजन्सी घराची डागडुजी करून देईल. यासाठी स्थानिक अधिकारी नुकसान भरपाईबाबत बोलत आहेत.

दरम्यान गेल्यावर्षी चोन बरीमध्ये जंगली हत्तींद्वारे एका दुकाचीस्वाराचा पाठलाग करण्याची घटना समोर आली होती. जीव  वाचवण्यासाठी हा दुचाकीस्वार एका घरात शिरला होता. तर हत्तीने त्या घराचा पुढील भाग तोडला होता. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Watch photo of wild hungry elephant who entered in kitchen after breaking wall to find food in Thailand house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app