Video : भन्नाट भोजपूरी गाण्यावर आजोबांनी धरला ठेका, तुम्हीही व्हाल आजोबांचे फॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 16:53 IST2019-03-13T16:53:20+5:302019-03-13T16:53:53+5:30
सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एका आजोबांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कारणही तसंच आहे...

Video : भन्नाट भोजपूरी गाण्यावर आजोबांनी धरला ठेका, तुम्हीही व्हाल आजोबांचे फॅन!
सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून एका आजोबांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कारणही तसंच आहे....या आजोबांनी 'गोरी तोहरी चुनरी बा लाल-लाल हो...' या गाण्यावर असा काही ठेका धरलाय की, बघणारे बघतच राहतात. कारण त्यांच्या बाजूला नाचणाऱ्या तरूणांकडे कुणी ढुंकूनही बघत नाही इतका भन्नाट डान्स या आजोबांनी केलाय.
काही दिवसांपूर्वी डान्सिंग अंकलची चर्चा रंगली होती. आता या आजोबांची. ते भोजपूरीमध्ये म्हणतात ना 'गर्दा उडा दिया' तसंच काहीसं या आजोबांनी केलंय. हा व्हिडीओ 'द बिहार मेल' या नावाच्या फेसबुक पेजने शेअर केला आहे. तुम्ही जराही वेळ न दडवता हा आजोबांचा भन्नाट डान्स बघाच.
या आजोबांची कमाल म्हणजे ते धोतर नेसून इतका जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ते एखाद्या तरबेज डान्सरप्रमाणे डान्स करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा डान्स अधिकच आकर्षक वाटत आहे.