Video : चोर बंदुक घेऊन शिरला बारमध्ये, 'हा' पठ्ठ्या जागचा न हलता ढोसत राहिला दारू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 13:03 IST2019-09-07T13:02:48+5:302019-09-07T13:03:07+5:30

समोरून एखादी व्यक्ती भलीमोठी बंदुक घेऊन येतो आणि तुम्हाला जवळ असलेले पैसे देण्यास सांगतो तेव्हा सामान्यपणे कोणीही आवाज न करता सगळे पैसे काढून देईल.

Watch man stays amazingly calm during armed robbery in America | Video : चोर बंदुक घेऊन शिरला बारमध्ये, 'हा' पठ्ठ्या जागचा न हलता ढोसत राहिला दारू!

Video : चोर बंदुक घेऊन शिरला बारमध्ये, 'हा' पठ्ठ्या जागचा न हलता ढोसत राहिला दारू!

समोरून एखादी व्यक्ती भलीमोठी बंदुक घेऊन येतो आणि तुम्हाला जवळ असलेले पैसे देण्यास सांगतो तेव्हा सामान्यपणे कोणीही आवाज न करता सगळे पैसे काढून देईल. त्या व्यक्तीच्या नाही पण बंदुकीच्या भीतीने तुम्ही हे करताच करता. कधी कुठे गोळी मारेल, याचा विचार करूनच अनेकांची अर्थातच भंबेरी उडेल. पण एका बारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने अशा स्थितीत कमालच केली. अमेरिकेतील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्यक्तीला जगातला सर्वात कूल व्यक्ती असंही लोक म्हणत आहेत.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती बारमध्ये बसून आहे. अशातच एका चोर आत येतो. त्याच्या हातात एक बंदुक आहे. बारमधील सगळेच लोक घाबरतात. पण एका व्यक्तीला कशाची काही पडलेली नाहीये. चोर बंदुकीचा धाक दाखवून त्या व्यक्तीचा फोन हिसकावतो, पण तो देत नाही. तो बिनधास्तपणे त्याच्या समोर असलेल्या दारूचे घोटावर घोट घेत राहतो. एका रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव Tony Tovar आहे.

या कूल व्यक्तीच्या कारनाम्यामुळे हा व्हिडीओ फेसबुक-ट्विटरवर व्हायरल झाला आहे. काही लोक म्हणताहेत की, ही व्यक्ती आमची हिरो आहे. 

या व्हिडीओत दिसणार चोर हा पकडला गेला आहे. 

Web Title: Watch man stays amazingly calm during armed robbery in America