Video: कुटुंबासाठी कायपण..; फ्रॅक्चर हाताने ऑटो चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:35 IST2026-03-17T16:33:37+5:302026-03-17T16:35:25+5:30
Viral Video: तरुणाच्या जिद्दीला सलाम...

Video: कुटुंबासाठी कायपण..; फ्रॅक्चर हाताने ऑटो चालवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video: पोटाची भूक अन् कुटुंबाची जबाबदारी असेल, तर वेदनाही लहान वाटतात, याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या 31 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये गंभीर जखमी अवस्थेत असलेला एक तरुण आपल्या कुटुंबासाठी रस्त्यावर ऑटो चालवत असल्याचे दिसत आहे.
जखमी हातात रॉड, तरीही काम सुरू
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीच्या उजव्या हातात खांद्यापासून कोपरापर्यंत मेटल रॉड बसवलेली दिसते. हे रॉड सहसा गंभीर फ्रॅक्चरनंतर हाडे जोडण्यासाठी वापरली जातात. अशा वेदनादायक परिस्थितीतही हा चालक ऑटो चालवत असल्याने अनेकजण त्याच्या जिद्दीचे कौतुक करत आहेत.
Despite a fractured arm with a rod inserted, Man Drives auto for his Family🥹 pic.twitter.com/aFOUIoq1tq
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 17, 2026
जिद्द आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
हा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधी शूट करण्यात आला, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. नेटिझन्स या व्हिडिओतील तरुणाला खऱ्या आयुष्यातील हिरो संबोधत आहेत. अनेकांनी या चालकाच्या संघर्षाला सलाम केला आहे. एका युजरने लिहिले, समाजात असे अनेक हिरो आहेत, जे रोज कुटुंबासाठी संघर्ष करतात. तर दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, खरा माणूस तोच, जो कुटुंबासाठी प्रत्येक वेदना सहन करतो.
हा व्हिडिओ केवळ एका व्यक्तीच्या संघर्षाची कथा नसून, रोजच्या आयुष्यातील असंख्य सामान्य लोकांच्या जिद्दीचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे. कुटुंबासाठी कोणत्याही परिस्थितीत काम करणाऱ्या या चालकाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दरम्यान, ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आहे. या व्हिडिओतील दाव्यांची आम्ही पुष्टी करत नाही.