VIDEO : दलदलमध्ये अडकून मरणार होती मेंढी, देवदूत बनून आली महिला आणि केलं असं काम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 10:37 IST2023-10-04T10:36:10+5:302023-10-04T10:37:12+5:30
Rescue Video : या महिलेचं नाव लिन आहे. तिनेच या मेंढीला मरता मरता वाचवलं. लिनने इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

VIDEO : दलदलमध्ये अडकून मरणार होती मेंढी, देवदूत बनून आली महिला आणि केलं असं काम...
Sheep Viral Video: प्राणी हे मनुष्यांच्या जीवनात फार महत्वाचे आहेत. एक चांगला समाज आणि पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी गरजू लोकांची मदत करणं आपलं कर्तव्य आहे. दलदलमध्ये फसलेल्या एका मेंढीला वाचवणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या महिलेचं नाव लिन आहे. तिनेच या मेंढीला मरता मरता वाचवलं. लिनने इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मोर्न पर्वतावरून परत येताना मला एक आवाज ऐकू आला. तेव्हा मला चिखलात अडकलेली एक मेंढी दिसली. कशाचाही विचार न करता मी धावत गेले आणि मेंढीला खेचून बाहेर काढलं. मी तिचे शिंगं पकडले आणि तिला नदीमध्ये नेलं. तिला धुतल्यानंतर बाहेर काढलं. आता ती मेंढी बरी आहे आणि तिच्या कळपात जाण्यासाठी सक्षम आहे. हा असा क्षण होता जो मी नेहमीच लक्षात ठेवेन'.
व्हिडिओत तुम्ही दलदलमध्ये अडकलेली मेंढी बघू शकता. लिन लगेच तिच्या बचावासाठी येते आणि तिचे शिंगं पकडून तिला बाहेर खेचते. मेंढी बाहेर आल्यावर तिला निट चालता येत नाही, नंतर ती पायांवर उभी झाली. लिनने नंतर मेंढीसोबत सेल्फी घेतली. या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. लोक लिनचं कौतुक करत आहेत.