Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:00 IST2025-06-13T17:00:28+5:302025-06-13T17:00:43+5:30

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरच आपल्या पतीला चांगलाच धुलाईचा प्रसाद देताना दिसते आहे.

Viral Video: Wife gets angry after seeing her husband's second wife, takes off her slippers and...; Big uproar on the street! | Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

पती-पत्नीमध्ये भांडणं होणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण जेव्हा हे भांडण घराऐवजी थेट रस्त्यावर येतं आणि शब्दांऐवजी चपलांचा वापर होतो, तेव्हा मात्र प्रकरण गंभीर झालंय, हे समजून जायला हवं. बरेली (उत्तर प्रदेश) येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरच आपल्या पतीला चांगलाच धुलाईचा प्रसाद देताना दिसते आहे.

या महिलेने पतीला चपलेने मारताना आरोप केले की, तिचा पती गेल्या १० वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. त्यामुळेच ती थेट रस्त्यावरच त्याला धडा शिकवायला निघाली. आसपासचे लोकसुद्धा थांबून हा संपूर्ण हाय व्हॉल्टेज ड्रामा तिथेच उभे राहून पाहू लागले.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओमध्ये ती बाई संतापून म्हणते की, "मी तुला या चप्पलांनी मारेन!" आणि खरंच, ती त्याच्यावर चप्पल उगारते. त्यावेळी पती घाबरून पळू लागतो, तेव्हा ही महिला त्याच्या मागे धावत जाते आणि चप्पल फेकते. हा सगळा प्रकार २७ सेकंदांच्या व्हिडीओत कैद झाला आहे.

पोलिसांनी घेतली दखल
या प्रकरणाची दखल घेत बरेली पोलिसांनी ट्वीट करून सांगितले आहे की, "कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांना योग्य चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." या महिलेने आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

इंटरनेटवर व्हायरल झाला व्हिडीओ!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तो तूफान व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला. नेटकऱ्यांनी या घटनेचं 'बरेलीमध्ये पती-पत्नीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा' असं वर्णन केलं.

Web Title: Viral Video: Wife gets angry after seeing her husband's second wife, takes off her slippers and...; Big uproar on the street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.