VIDEO: "प्रेम असतं तर..."; १२ हजाराच्या गिफ्टसाठी ढसाढसा रडली बायको, मग नवऱ्याने काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:15 IST2026-02-11T14:04:45+5:302026-02-11T14:15:30+5:30
husband wife viral video: व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कुणाची बाजू घेतली.... वाचा सविस्तर

VIDEO: "प्रेम असतं तर..."; १२ हजाराच्या गिफ्टसाठी ढसाढसा रडली बायको, मग नवऱ्याने काय केलं?
husband wife viral video: सध्या प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू आहे. असे असतानाच सोशल मीडियावर एका दाम्पत्याचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये एक पत्नी १२ हजार रुपयांच्या गिफ्टसाठी ढसाढसा रडताना दिसत आहे, तर तिचा पती कॅमेऱ्याच्या मागून तिची माफी मागताना आणि आपली आर्थिक परिस्थिती समजावून सांगताना ऐकू येत आहे.
नेमकी घटना काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला कॅमेऱ्यासमोर बसून रडत तक्रार करत आहे. तिचे म्हणणे आहे की, तिला दुकानातली एक वस्तू खूप आवडली होती, ज्याची किंमत १२ हजार रुपये होती. मात्र, पतीने "पैसे नाहीत" असे सांगून तिला ती वस्तू घेऊन देण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते, "जर तुझे माझ्यावर खरे प्रेम असते, तर तू न सांगता माझी इच्छा समजून घेतली असती." दुसरीकडे, पती वारंवार तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे.
Husband can't afford a ₹12k gift for his beautiful wife. pic.twitter.com/bdDFMHgYbV
— Nand@n (@nandantwts) February 8, 2026
हा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @nandantwts नावाच्या युजरने शेअर केला असून नेटकऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही युजर्सचे म्हणणे आहे की, एका मध्यमवर्गीय माणसासाठी १२ हजार रुपये ही मोठी रक्कम असते. सकाळी ८ ते रात्री ८ काम करणाऱ्या माणसाने केवळ 'दिखाव्यासाठी' कर्ज काढून किंवा बजेटबाहेर जाऊन खर्च करावा, हे चुकीचे आहे. पतीची हतबलता पाहून अनेकांनी पत्नीच्या वागण्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी असे मत मांडले की, जर घरातील स्त्री वर्षभरातून एकदाच काहीतरी मागत असेल, तर तिला थेट नकार देणे तिच्या भावनांचा अपमान आहे. या वादातून 'महिलांचे स्वतःचे उत्पन्न असणे किती गरजेचे आहे' यावरही चर्चा सुरू झाली आहे.
हा 'स्क्रिप्टेड' ड्रामा?
अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींच्या मते, सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी हा एक ठरवून शूट केलेला (Scripted) व्हिडिओ असू शकतो. कारण नवरा-बायकोतील वाद इंटरनेट कुणी कशासाठी मुद्दाम पोस्ट करेल असे काहींचे मत आहे.