Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 22:58 IST2025-06-18T22:55:03+5:302025-06-18T22:58:38+5:30

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या लहान मुलाला सिंहासोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे.

Viral Video: Why is he so stubborn? Dad was putting the baby on the lion's back, look what happened next... | Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 

Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 

आजकाल व्हिडीओ आणि रील्सचा जमाना आहे. लोक तासंतास रील्स पाहण्यात घालवतात आणि त्यापैकी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यानंतर एका युवकाच्या पालकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या लहान मुलाला सिंहासोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे. तो मुलाला सिंहाच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना मुलगा रडू लागतो, हे बघून आता सगळेच व्हिडीओतल्या बाबांवर टीका करत आहेत.

सिंहाच्या पाठीवर बसवताना मुलगा रडू लागला
'बॅडपैरेंटिंगटीव्ही' (BadparentingTV) नावाच्या इन्स्टाग्राम हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात एका पिंजऱ्यात सिंह बसलेला दिसतोय. तो तरुण आपल्या लहान मुलाला त्याच्या पाठीवर बसवण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी सिंह अचानक मागे फिरतो, ज्यामुळे मुलाला आणखी भीती वाटते. छोटा मुलगा सतत रडत राहतो, पण त्याचे वडील हे पाहून हसतात. सुदैवाने, सिंहाने मुलाला कोणतीही इजा केली नाही. काही वेळाने तो तरुण मुलाला घेऊन तिथून दूर जातो. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "एक वडील सिंहासोबत आपल्या मुलाचा फोटो घेण्यासाठी जबरदस्ती करत आहेत."


नेटकऱ्यांकडून जोरदार टीका
या व्हिडीओला आतापर्यंत पाच हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. युजर्स त्या युवकावर जोरदार टीका करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, "या माणसाला त्वरित अटक व्हायला पाहिजे आणि मुलाला त्याच्याकडून काढून घ्यायला पाहिजे."

दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "बिचारा सिंह! कोणत्याही प्राण्याचा वापर माणसांच्या मनोरंजनासाठी करू नये." आणखी एका युजरने याला 'बॅड पेरेंटिंग' म्हटले आहे. एका युजरने म्हटले की, "सिंह खूप क्यूट आहे." तर, तरुणावर संताप व्यक्त करत एका युजरने लिहिले की, "फक्त एका फोटोसाठी तुम्ही तुमच्या मुलाचा जीव धोक्यात घालत आहात. मुलांना जन्म देण्यापूर्वी पालकांनी 'पेरेंटिंग कोर्स' करायला पाहिजे."

Web Title: Viral Video: Why is he so stubborn? Dad was putting the baby on the lion's back, look what happened next...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.