Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 10:58 IST2025-07-10T10:46:47+5:302025-07-10T10:58:15+5:30

Viral Cooler Video : एका व्यक्तीने जुगाडाने एक सुंदर आणि टिकाऊ कूलर तयार केला आहे. हा कूलर पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Viral Video: What do you understand by looking at bricks and cement? Patthya made a cool cooler at home; It is also competing with AC | Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर

Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर

जून महिन्याच्या रखरखीत उन्हाळ्यानंतर आता जुलै महिन्यातही काही ठिकाणी असह्य उकाड्याचा सामना सर्वसामान्य लोकांना करावा लागत आहे. परिस्थिती अशी आहे की, घरात लावलेले कुलर आणि पंखेही निकामी ठरत आहेत आणि चार भिंतींच्या आत असूनही लोकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. मात्र, काही लोक असे असतात जे स्वतःला बचाव करण्यासाठी भन्नाट जुगाड करतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे, ज्यात एका व्यक्तीने जुगाडाच्या मदतीने एक सुंदर आणि टिकाऊ कुलर तयार केला आहे. हा कूलर पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

एका सामान्य माणसाला भंगारात फक्त भंगारच दिसते, पण एक जुगाड करणारा माणूस त्यात आपल्यासाठी संधी शोधतो. त्यावर तो अशी कलाकुसर करतो, जी पाहिल्यानंतर चांगले-चांगले हुशार लोकसुद्धा थक्क होतात आणि विचारात पडतात. आता समोर आलेला हा व्हिडीओच पाहा, जिथे एका व्यक्तीने जुगाडाच्या जादूने असा कूलर बनवला आहे, जो पाहून लोक विचारात तर पडले आहेतच आणि या जुगाड करणाऱ्याचे कौतुकही करत आहेत.

माणसांसाठी नाही, जनावरांसाठी बनवला 'तो' कूलर
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका व्यक्तीने आपल्या घरात विटा आणि सिमेंटचा वापर करून एक मजबूत कूलर बनवला आहे. या कूलरला मोठे वादळही हलवू शकत नाही. या व्यक्तीने हा कूलर माणसांसाठी नाही, तर जनावरांसाठी बनवला आहे. कारण उष्णतेचा परिणाम केवळ माणसांवरच नाही, तर जनावरांवरही होतो. अशा परिस्थितीत आपल्या पशुधनाचे रक्षण करण्यासाठी या व्यक्तीने हा जुगाड केला आहे, जेणेकरून जनावरांवर उष्णतेचा परिणाम होऊ नये. या कूलरमध्ये सामान्य लोखंडी कूलरमध्ये वापरले जाणारे गवत वापरले आहे आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक पाईपही बसवला आहे.


व्हिडीओ तुफान व्हायरल, कमेंट्सचा वर्षाव
हा व्हिडीओ 'shispal_sahu' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक याला केवळ लाईकच करत नाहीत तर, तो शेअर देखील करत आहेत. एका युझरने लिहिले की, "भाऊ काहीही म्हणा, या व्यक्तीचा जुगाड जबरदस्त आहे." तर दुसऱ्याने लिहिले की, "भाऊ, पशुधन आणि जनावरांना वाचवण्यासाठी काय भारी जुगाड आहे!" आणखी एकाने लिहिले की, "असे लोक आता खूप कमी राहिले आहेत, जे अशा प्रकारचा कूलर बनवतील."

Web Title: Viral Video: What do you understand by looking at bricks and cement? Patthya made a cool cooler at home; It is also competing with AC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.