Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 08:43 IST2025-07-17T08:42:52+5:302025-07-17T08:43:06+5:30
चोरटे नेहमी संधीच्या शोधात असतात आणि मिळताच आपला हात साफ करून पसार होतात. पण, प्रत्येक वेळी त्यांना यश मिळतं असं नाही.

Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
Gym Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेशीर आणि कधी कधी विचार करायला लावणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार चर्चेत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही आणि कदाचित त्या चोराची दयाही येईल.
चोरटे नेहमी संधीच्या शोधात असतात आणि मिळताच आपला हात साफ करून पसार होतात. पण, प्रत्येक वेळी त्यांना यश मिळतं असं नाही. अनेकदा ते रंगेहात पकडले जातात आणि मग त्यांची जी अवस्था होते, ती पाहून त्यांची पुढे चोरी करण्याची हिंमतच होत नाही. असाच काहीसा प्रकार एका जिममध्ये चोरी करायला गेलेल्या चोरासोबत घडला आहे.
चोराला दिली आगळी वेगळी शिक्षा!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चोर जिममध्ये चोरी करताना पकडला जातो. पण जिथे त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं, तिथे जिममधील लोकांनी त्याला एक वेगळीच शिक्षा देण्याचं ठरवलं. त्यांनी त्याला पोलिसांच्या हाती न देता, चक्क वर्कआउट करण्याची शिक्षा दिली. सुरुवातीला त्याला पुश-अप्स करायला लावले. त्यानंतर त्याला जड वजन उचलण्यास सांगितलं. एवढंच नाही तर स्क्वॅट्स आणि प्लँकसारखे दमवणारे व्यायामही त्याच्याकडून करून घेण्यात आले.
व्यायाम करताना तो चोर वारंवार थकून खाली पडत होता, अडखळत होता, पण जिममधील ट्रेनरने त्याला अजिबात सोडलं नाही. त्याची पूर्णपणे दमछाक होईपर्यंत त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यात आला. हे दृश्य पाहून वापरकर्त्यांना त्या चोराची दया आल्याचे कमेंट्समध्ये दिसत आहे.
Thief Forced to Exercise After Being Caught in Cox's Bazar Gym
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 12, 2025
pic.twitter.com/iaPhNJmRcC
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
'gharkekalesh' नावाच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलंय, "खरंच भावा, या चोराची तर लोकांनी फिटनेसच बनवली!" दुसऱ्याने म्हटलंय, "खरं सांगायचं तर आता मला या चोराची दया येतेय." तर आणखी एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे, "या शिक्षेनंतर हा चोर नक्कीच आपला धंदा बदलेल!"