Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:37 IST2025-06-09T16:37:32+5:302025-06-09T16:37:55+5:30

या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स करत व्हिडीओची खिल्ली उडवली आहे.

Viral Video: Went to impress a girl and got cheated on! After watching the young man's video, you will also say, "Oh my.." | Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..

Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..

सोशल मीडियावर सध्या एक मनोरंजक प्रँक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दाखवलेली गंमत पाहून प्रेक्षकांना आपले हसू आवरणे कठीण होत आहे. काही व्हिडीओ इतके हुशारीने बनवलेले असतात की, त्यातील क्षण आणि लोकांची प्रतिक्रिया एकत्रितपणे मनोरंजनाचा डोस बनून सोशल मीडिया वापरकर्त्यांना खिळवून ठेवते. असाच एक व्हिडीओ सध्या 'prankwithguddu' या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओत काय घडते?

या व्हिडीओमध्ये एक तरुण पार्कमध्ये एका मुलीसमोर जाऊन अंगावर परफ्यूम मारतो. त्या परफ्यूमच्या सुगंधाने मुलगी लगेच इम्प्रेस होते आणि त्याच्यासोबत निघून जाते. हा प्रसंग पाहून मागे उभा असलेला दुसरा तरुण प्रेरित होतो आणि तोही तोच परफ्यूम वापरण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याला हे माहिती नसते की, ती बाटली परफ्यूमची नसून फेस क्रीमची आहे. तो दुसऱ्या मुलीसमोर परफ्यूम समजून तो स्प्रे मरतो आणि त्याच्या संपूर्ण अंगावर आणि चेहऱ्यावर फेस पसरतो. त्याची अवस्था पाहून मुलगी इम्प्रेस होण्याऐवजी जोरजोरात हसू लागते.


नेटिझन्सची प्रतिक्रिया

या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स करत व्हिडीओची खिल्ली उडवली आहे. एका युजरने लिहिले की, “बाबू भैय्या एका मुलीच्या प्रेमासाठी काय काय करत नाही!” तर, दुसऱ्याने लिहिले की, “स्टाईल दाखवायला गेला आणि मूर्ख बनून परत आला.” आणखी एका युजरने कमेंट केली, “प्रँकची स्क्रिप्ट भन्नाट आहे!”

हा प्रँक पूर्णपणे प्लॅन केला होता, पण पाहणाऱ्यांसाठी तो निखळ मनोरंजन देणारा ठरला आहे. अशा व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर हसण्याचं एक टॉनिकच मिळतं. 

Web Title: Viral Video: Went to impress a girl and got cheated on! After watching the young man's video, you will also say, "Oh my.."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.