धावत्या ट्रेनमध्ये कुत्र्याला चढवण्याचा प्रयत्न, अचानक पाय घसरला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:36 IST2026-02-17T15:36:32+5:302026-02-17T15:36:58+5:30

Viral Video: सोशल मीडियावर हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल; नागरिकांचा संताप

Viral Video: Trying to get a dog on a moving train, suddenly foot slipped and...shocking video goes viral | धावत्या ट्रेनमध्ये कुत्र्याला चढवण्याचा प्रयत्न, अचानक पाय घसरला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

धावत्या ट्रेनमध्ये कुत्र्याला चढवण्याचा प्रयत्न, अचानक पाय घसरला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Viral Video: रेल्वे स्थानकांवर दररोज हजारो प्रवासी गाड्या पकडण्यासाठी धावपळ करताना दिसतात. अनेकदा काही जण चलत्या ट्रेनमध्ये चढण्याचा धोकादायक प्रयत्न करतात. अशीच एक गंभीर व हृदयद्रावक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माणसाच्या निष्काळजीपणाची किंमत एका मुक्या प्राण्याला जीव गमावून चुकवावी लागली आहे.

व्हिडिओत काय आहे?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासह धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, यादरम्यान कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा सुटतो अन् तो मुका जीव थेट रेल्वेखाली जातो.

प्लॅटफॉर्मवरील प्रवासी हादरले

ही घटना इतकी अचानक घडली की, प्लॅटफॉर्मवरील प्रवासी स्तब्ध झाले. कुत्रा ट्रेनखाली सापडल्याचे दृश्य पाहून उपस्थित घाबरले. काही प्रवासी मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता, असे व्हिडिओतून स्पष्ट होते.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ ‘X’ (माजी ट्विटर) वर @dbabuadvocate या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून, हजारो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, देवा, तो कुत्रा वाचला का? दुसऱ्याने अंदाज व्यक्त करत म्हटले, बहुधा कुत्रा वाचला नसावा. काहींनी थेट संताप व्यक्त करत, अशा निष्काळजी पाळीव प्राणी मालकावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

Web Title : चलती ट्रेन में कुत्ते को चढ़ाने की कोशिश, मालिक से हुई चूक, कुत्ते की मौत

Web Summary : एक व्यक्ति ने अपने कुत्ते को चलती ट्रेन में चढ़ाने की कोशिश की, लेकिन कुत्ता फिसल गया और ट्रेन के नीचे आ गया, जिससे उसकी मौत हो गई। इस घटना से सोशल मीडिया पर आक्रोश फैल गया है, और लोग मालिक के खिलाफ कार्रवाई की मांग कर रहे हैं।

Web Title : Dog dies after owner tries to board moving train: Viral video.

Web Summary : A man's attempt to board a moving train with his dog turned tragic. The dog slipped, fell under the train, and died. The incident sparked outrage online, with calls for action against the owner's negligence.