VIDEO : पैसे लुटण्यासाठी रेस्टॉरन्टमध्ये शिरला चोर, मग स्टाफने केली त्याची अशी अवस्था बघून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:33 IST2021-12-30T18:22:16+5:302021-12-30T18:33:02+5:30
Thief Viral Video : एक चोर एका रेस्टॉरन्टमध्ये हेल्मेट घालून घुसतो आणि रेस्टॉरन्टच्या कॅश काउंटवरून पैसे घेऊ लागतो. त्यानंतर चोरासोबत जे होतं ते सीसीटीव्ही कैद झालं आहे.

VIDEO : पैसे लुटण्यासाठी रेस्टॉरन्टमध्ये शिरला चोर, मग स्टाफने केली त्याची अशी अवस्था बघून व्हाल हैराण
Thief Viral Video : एखाद्या स्टोरमध्ये किंवा बॅकेत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी आजकाल सीसीटीव्ही कॅमेरे असतातच. त्यामुळे ते कॅमेरात कैद होतात. ज्यामुळे पोलिसांनाही चौकशी करण्यास मदत मिळते. अशीच एका चोरीची घटना समोर आली आहे. एक चोर एका रेस्टॉरन्टमध्ये हेल्मेट घालून घुसतो आणि रेस्टॉरन्टच्या कॅश काउंटरवरून पैसे घेऊ लागतो. त्यानंतर चोरासोबत जे होतं ते सीसीटीव्ही कैद झालं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता की, एक हेल्मेट घातलेली व्यक्ती थेट रेस्टॉरन्टच्या कॅश काउंटरजवळ जाते आणि काउंटरवरून पैसे घेऊ लागते. हे सगळं तो त्याच्या खिशातील शस्त्राचा धाक दाखवून करतो. अशात रेस्टॉरन्टमधील एका स्टाफला हे लक्षात येतं की, कॅश काउंटरला असलेली व्यक्ती कुणी ग्राहक नाही. स्टाफ बाजूला असलेली फोल्डींग खुर्ची घेतो आणि थेट चोराच्या डोक्यात टाकतो.
रेस्टॉरन्ट स्टाफ न थांबता खुर्चीने त्याच्यावर वार करू लागतो. यावेळी बाजूला असलेली दोन लहान मुलं पळून जातात आणि इतक्यातच रेस्टॉरन्ट बाकीचा स्टाफ तिथे येतो. चोर पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण सगळे मिळून त्याला खाली दाबून धरतात. चोरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हे समजू शकलेलं नाही की, हा व्हिडीओ कुठला आहे. पुढे चोराचं काय झालं हेही समजू शकलं नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मीम वाला न्यूज या पेजवर शेअर करण्यात आला आहे.