उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्याचं उत्तर वाचून हसून हसून लोटपोट झाली शिक्षिका, तुम्हीही हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:17 PM2024-03-19T13:17:47+5:302024-03-19T13:20:23+5:30

Viral Video : व्हिडिओत एक शिक्षिका पेपर चेक करताना दिसत आहे. विद्यार्थ्याने विज्ञानाच्या एका प्रश्नाचं असं उत्तर दिलं आहे की, तुम्ही तुमचं पोट धरून हसत बसाल.

Viral Video : Student wrote something in the answer sheet teacher is unable to stop laughing | उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्याचं उत्तर वाचून हसून हसून लोटपोट झाली शिक्षिका, तुम्हीही हसाल!

उत्तर पत्रिकेत विद्यार्थ्याचं उत्तर वाचून हसून हसून लोटपोट झाली शिक्षिका, तुम्हीही हसाल!

Viral Video : सध्या वेगवेगळ्या परीक्षा सुरू आहेत आणि शाळेतील मुले परीक्षेमुळे टेंशनमध्ये आहेत. अशात एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून तुमचं हसू आवरणार नाही. व्हिडिओत एक शिक्षिका पेपर चेक करताना दिसत आहे. विद्यार्थ्याने विज्ञानाच्या एका प्रश्नाचं असं उत्तर दिलं आहे की, तुम्ही तुमचं पोट धरून हसत बसाल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ RVCJ Media नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. ज्यात एक महिला शिक्षक आपल्या विद्यार्थ्याचा पेपर चेक करत आहे. यादरम्यान त्यांचे हावभाव बघण्यासारखे आहेत. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, पेपर चेक करता करता महिला हसून हसून लोटपोट झाली आहे. कारण त्याने उत्तर असं लिहिलं ज्याची अपेक्षा नव्हती.

पेपरमध्ये इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, What is laws of reflection. यावर मुलाने अजब उत्तर लिहिलं. त्याने लिहिलं की, 'यहां ये वाला नहीं है और बस कोई नहीं है'. त्यानंतरच्या एका प्रश्नाचं उत्तर त्याने लिहिलं की, 'वहां वाला यहां और कुछ नहीं है'. मुलाने आपल्या हिशेबाने हिंदीत मॅडमसाठी संदेश दिला आहे. जो वाचून महिला हसून हसून लोटपोट झाली.

या व्हिडिओला 19 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आणि लोक भरभरून यावर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, बॅकबेंचर्स आहे आम्ही पुस्तकातील नाही पूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान असतं.

Web Title: Viral Video : Student wrote something in the answer sheet teacher is unable to stop laughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.