VIDEO : विंचवाशी पंगा घेत होता ७ फूट लांब कोब्रा, पण झालं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 16:01 IST2024-10-11T15:57:13+5:302024-10-11T16:01:05+5:30

Viral Video : साप आणि मुंगसाच्या लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण साप आणि विंचवाचा असा व्हिडीओ पाहिला नसेल.

Viral Video : Snake and scorpion fight video goes viral | VIDEO : विंचवाशी पंगा घेत होता ७ फूट लांब कोब्रा, पण झालं असं काही....

VIDEO : विंचवाशी पंगा घेत होता ७ फूट लांब कोब्रा, पण झालं असं काही....

Snake and Scorpion Video Viral: सोशल मीडिया सापांचे वेगवेगळे अवाक् करणारे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ थरकाप उडवणारे तर काही थक्क करणारे असतात. सध्या साप आणि विंचवाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. साप आणि मुंगसाच्या लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण साप आणि विंचवाचा असा व्हिडीओ पाहिला नसेल.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, साप एका घरात आहे आणि तिथेच एक विंचू येताना दिसत आहे. बघता बघता विंचू सापाच्या खूप जवळ जातो. नंतर काय होतं हे काही बघायला मिळत नाही. कारण व्हिडीओ इथेच संपतो. मात्र, लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की, दोघांच्या लढाईमध्ये शेवटी जिंकलं कोण?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. यात साप आणि विंचवाचा आमना-सामना बघायला मिळत आहे. यात विंचू सापाच्या घरात शिरल्यावर सापाची प्रतिक्रिया बघायला मिळत आहे. व्हिडिओच्या सुरूवातील एक काळा नाग घरात आरामात बसलेला दिसत आहे. तेव्हा अचानक तिथे एक विंचू येतो. असं दिसतं की, विंचू आल्यावर साप जरा घाबरला आहे. 

अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. इनस्टाग्रामवर हा व्हिडीओ @rijeshkv_80 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ५४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 
 

Web Title: Viral Video : Snake and scorpion fight video goes viral