VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 20:21 IST2025-09-26T20:18:42+5:302025-09-26T20:21:45+5:30
small kid eating chillies video: तो लहान मुलगा काकडी किंवा गाजर खावं तशा मिरच्या खाताना दिसतोय

VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
small kid eating chillies video: एखाद्या माणसाला नुसत्या मिर्च्या खायला सांगितल्या तर कुणीही पटकन तयार होणार नाही. तिखट पदार्थ आवडणारा व्यक्ती असेल तरीही तो फक्त मिरची खाईल का, याबाबत थोडीशी साशंकताच आहे. पण जर तुम्हाला असं सांगितलं की, एक लहान मुलगा एखादी भाजी किंवा काकडी-गाजर खावं तशा मिरच्या खातो तर.... तुम्हालाही हा विनोद वाटेल. पण सध्या एक व्हिडीओ होतोय, ज्यात एक छोटा मुलगा चक्क हिरव्या मिरच्या कचाकचा खाताना दिसतोय.
व्हिडिओमध्ये मुलासमोर भात, डाळ, कांदे आणि मिरच्यांनी भरलेली प्लेट ठेवलेली दिसते आणि तो मुलगा आनंदाने मिरच्या खातो. सुरुवातीला असे वाटते की तो मुलगा मिरच्या फोडून फेकून देईल. पण तो मिरची खायला लागतो. तेव्हाही असे वाटते की फक्त एक चावा घेतल्यानंतर तो रडू लागेल. पण असे काहीही घडत नाही. तो मिरच्या फेकत नाही किंवा रडतही नाही. त्याऐवजी, तो चक्क कचाकचा मिरच्या खाऊ लागतो. या लहानशा मुलाच्या या कृत्याने सर्वांनाच आश्चर्यचकित आणि थक्क केले आहे. पाहा व्हिडीओ-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ elsakunamaqueen नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३६ मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज आहेत. तसेच ३ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईकदेखील केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले की, हे मूल भविष्यात सर्वात मोठे मिरची प्रेमी असेल. तर काहींनी अशी कमेंट केली आहे की, हा मुलगा मिरची नव्हे तर बीन्स खात आहे.