धक्कादायक! समुद्राच्या लाटा आल्या अन् अख्ख गाव घेऊन गेल्या, पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:50 IST2025-05-02T16:50:02+5:302025-05-02T16:50:29+5:30

Viral Video: निसर्गासमोर मानवी शक्ती काहीच करू शकत नाही.

Viral Video: Shocking! waves of the sea came and took away the entire village, watch the video | धक्कादायक! समुद्राच्या लाटा आल्या अन् अख्ख गाव घेऊन गेल्या, पाहा व्हिडिओ...

धक्कादायक! समुद्राच्या लाटा आल्या अन् अख्ख गाव घेऊन गेल्या, पाहा व्हिडिओ...

Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. अलिकडेच एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. समुद्राच्या लाटांमध्ये एक अख्ख गाव वाहून गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावर वसलेले एक गाव, गावातील घरे समुद्राच्या लाटांसह समुद्राकडे सरकत असल्याचे स्पष्टपणे दिसते. काही वेळातच ते गाव पाण्यात नाहीसे होते. 

कुठला आहे व्हिडिओ ?
ही घटना नॉर्वे देशातील असल्याचा दावा केला जातोय. भूस्खलनामुळे नॉर्वेतील एक गाव समुद्रात बुडून जाते. बीबीसीच्या वृत्तानुसार, ही घटना 3 जून 2020 रोजी नॉर्वेच्या अल्ता प्रदेशात घडली. क्रेगेरो नावाच्या किनारी भागात भूस्खलनामुळे सुमारे 800 मीटर लांबीची जमीन समुद्रात वाहून गेली. या जमिनीच्या तुकड्यासोबत तेथे राहणाऱ्या लोकांची घरेही पाण्यात बुडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा व्हिडिओ बराच जुना असला तरी पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहून लोक घाबरले
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून X या सोशल साइटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून, हजारोांनी लाईक केले आहे. व्हिडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले - निसर्गासमोर आपण काहीच नाही. दुसऱ्याने लिहिले - पृथ्वी वाचवण्यासाठी काय करावे, याचा आपल्याला विचार करावा लागेल. तिसऱ्याने लिहिले - निसर्ग खूप क्रूर आहे. 
 

Web Title: Viral Video: Shocking! waves of the sea came and took away the entire village, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.