VIDEO: अनोळखी व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वत:ची कार लावली पणाला; संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 10:15 IST2021-11-22T16:47:17+5:302021-11-23T10:15:31+5:30
मागे असलेल्या कारच्या डॅशबोर्डवर असलेल्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटना रेकॉर्ड

VIDEO: अनोळखी व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वत:ची कार लावली पणाला; संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद
दोन कारच्या धडकेमुळे मृत्यू अशा घटना आपण अनेकदा ऐकतो. कारच्या धडकेमुळे प्रवासी जखमी झाल्याचे प्रकार आपल्या वाचनात येतात. दोन कारची धडक जीवघेणी ठरू शकते. मात्र नेदरलँडमध्ये दोन कारच्या धडकेमुळे संभाव्य अपघात टळला. एका कार चालकानं स्वत:ची कार धोक्यात घालत मोठा अनर्थ टाळला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक नियंत्रण सुटलेली कार दिसत आहे. ही कार द्रुतगती मार्गाशेजारी असलेल्या गवतातून धावत आहे. कार रस्त्याशेजारी असलेल्या रेलिंगला आपटते. मात्र तरीही ती धावत राहते. अनियंत्रित कारला रोखल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका चालकानं प्रसंगावधान दाखवलं. त्यानं लेन बदलत त्याची कार अनियंत्रित कारच्या पुढे आणली. त्यानंतर त्यानं ब्रेक दाबत स्वत:ची कार थांबवली. पुढच्या काही क्षणांत अनियंत्रित कार त्याच्या कारवर आदळली. त्यानंतर अनियंत्रित कार थांबली.
Man sacrifices his car to save another driver who was unconscious..
— Buitengebieden (@buitengebieden_) November 21, 2021
Via @RTVNunspeetpic.twitter.com/drgac0UDez
द्रुतगती मार्गावरील हा थरा दोन्ही कारच्या मागे असलेल्या कारमधील डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला. एका कारचा चालक बेशुद्ध पडल्यानं ती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे त्याचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या कारमधील चालकानं स्वत:चा जीव धोक्यात घातला. आतापर्यंत जवळपास ८ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २० हजारहून अधिक जणांनी कमेंट्स केल्या आहेत.