Video : दरोडेखोराची भलतीच पंचाईत, पिस्तुल हातातून सुटली आणि पळताना पॅंटही घसरली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 15:59 IST2018-09-08T15:58:14+5:302018-09-08T15:59:25+5:30
दुकानाच्या काऊंटरवर एक स्टाफ बसली होती. हा चोर आत शिरला आणि त्याने लपवलेली पिस्तुल काढली....

Video : दरोडेखोराची भलतीच पंचाईत, पिस्तुल हातातून सुटली आणि पळताना पॅंटही घसरली!
कधी कुणावर कशी वेळ येईल हे कधीच सांगता येत नसतं. नशीब कधी चांगला किंवा वाईट बघत नसतं. या व्हिडीओतील चोराचंच बघाना. तो एका स्टोरमध्ये चोरी करण्यासाठी गेला होता. दुकानाच्या काऊंटरवर एक स्टाफ बसली होती. हा चोर आत शिरला आणि त्याने लपवलेली पिस्तुल काढली खरी पण त्याला ती नीट पकडता आली नाही आणि ती पिस्तुल खाली पडली.
महिला त्याला पाहून आधीच घाबरली होती. पण तिने खाली पडलेली पिस्तुल लगेच उचलली आणि ते पाहून चोर इतका घाबरला की, उलट्या पावलांनी पळत सुटला. पण इथेही त्याची चांगलीच फजिती झाली. तो घाबरुन पळाला तर खरं पण त्याची पॅंटही खाली घसरली. चोराचा हा सगळा गंमतीदार कारनामा दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
अमेरिकेतील कोलारॅडो राज्याची राजधानी डेनवरमधील दुकानात हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हालरल झाला आहे.