VIDEO : कोट्यावधी रूपयांच्या गाडीची अशी केली अवस्था, बघून येईल तुम्हाला चक्कर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 12:39 IST2024-04-22T12:38:52+5:302024-04-22T12:39:22+5:30

Viral Video : एका व्यक्तीने एका महागड्या गाडीची अशी अवस्था केली आहे की बघून विश्वास बसणार नाही. 

Viral Video : Range rover car with wheels of Rickshaw is going viral | VIDEO : कोट्यावधी रूपयांच्या गाडीची अशी केली अवस्था, बघून येईल तुम्हाला चक्कर...

VIDEO : कोट्यावधी रूपयांच्या गाडीची अशी केली अवस्था, बघून येईल तुम्हाला चक्कर...

Viral Video : बरेच लोक महागड्या गाड्या खरेदी करतात. जेणेकरून त्यांचा आराम वाटावा आणि प्रवास करताना काही त्रास होऊ नये. पण भारतात गाड्यांवर एक्सपरिमेंट करणाऱ्यांची काही कमी नाही. वेगवेगळ्या गाड्यांना मोडिफाय करून त्यांचं रूप बदललं जातं. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने एका महागड्या गाडीची अशी अवस्था केली आहे की बघून विश्वास बसणार नाही. 

रेंज रोव्हर एक महागडी आणि आलिशान गाडी आहे. रेंज रोव्हर गाडी इतकी आलिशान आहे की, प्रवासात तुम्हाला काहीच अडचण होणार नाही. पण आकाश पांचाल नावाच्या व्यक्तीने रेंज रोव्हर गाडीचे टायर बदलले. त्यानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने रेंज रोव्हरचे टायर बदलले आणि त्यासोबत गाडी चालवत आहे. जे बघून कुणालाही धक्का बसेल. बरेच लोक म्हणाले की, त्याने रेंज रोव्हरला रिक्षा बनवलं आहे.

रेंज रोव्हरच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 41 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. एकाने लिहिलं की, असं फक्त भारतात होऊ शकतं. दुसऱ्याने लिहिलं की, हा एक्सपरिमेंट करणारा हेवी ड्रायव्हर आहे. तिसऱ्याने लिहिलं की, आता ते लोक याला शोधत येतील.

Web Title: Viral Video : Range rover car with wheels of Rickshaw is going viral