Video: दे दणादण..; रेल्वे कर्मचाऱ्यांची स्टेशनवर एकमेकांना बेल्ट अन् लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:09 IST2025-10-17T19:07:47+5:302025-10-17T19:09:16+5:30
Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: दे दणादण..; रेल्वे कर्मचाऱ्यांची स्टेशनवर एकमेकांना बेल्ट अन् लाथा-बुक्क्यांनी मारहाण
Viral Video: दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये IRCTC चे कर्मचारी असल्याचे एकमेकांना बेल्ट आणि लाथा-बुक्क्यांनी मारामारी करताना दिसत आहेत. काही क्षणांसाठी प्लॅटफॉर्म युद्धभूमीप्रमाणे दिसू लागला होता. स्टेशनवरील प्रवासी हे दृश्य पाहून स्तब्ध झाले.
वंदे भारत ट्रेनच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी
मिळालेल्या माहितीनुसार, खजुराहो वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काम करणाऱ्या दोन गटांतील कर्मचाऱ्यांमध्ये हा वाद झाला. ट्रेनमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. व्हिडिओमध्ये कर्मचारी बेल्ट काढून एकमेकांना मारताना दिसतात. काहींनी स्टेशनवरील डस्टबिन उचलून एकमेकांवर फेकून मारले.
IRCTC belt war at Nizamuddin railway station (At Delhi's Nizamuddin station, Kalesh broke out b/w IRCTC staff deployed on the Vande Bharat train, in which they attacked each other with dustbins, belts, and punches)
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 17, 2025
pic.twitter.com/dUApuRlf6o
पोलिसांचा हस्तक्षेप
हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत काही मिनिटे हा सर्व प्रकार सुरू होता. शेवटी रेल्वे पोलिसांनी धावत येऊन मध्यस्थी केली आणि दोन्ही गटांना शांत केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, दोन्ही गटांनी बोलून प्रकरण मिटवलं आहे.