Pregnant Woman Dance Video: प्रेग्नंट महिलेने पतीसोबत केला जबरदस्त डान्स; पाहुण्यांनी केला टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 11:40 IST2023-02-10T11:39:11+5:302023-02-10T11:40:27+5:30

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे

viral video pregnant woman dances to maan meri jaan baby shower netizens reactions | Pregnant Woman Dance Video: प्रेग्नंट महिलेने पतीसोबत केला जबरदस्त डान्स; पाहुण्यांनी केला टाळ्यांचा कडकडाट

Pregnant Woman Dance Video: प्रेग्नंट महिलेने पतीसोबत केला जबरदस्त डान्स; पाहुण्यांनी केला टाळ्यांचा कडकडाट

Pregnant Woman Dance With Husband: सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण नुकताच एक अनोखा डान्स समोर आला आहे. यामध्ये एक गर्भवती महिला तिच्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे. या दरम्यान तिचे कुटुंबीय आणि तिचे नातेवाईक आजूबाजूला उभे आहेत. संगीत वाजत आहे आणि ती तिच्या पतीसोबत एका गाण्यावर नाचताना दिसत आहे.

डोहाळजेवणाच्या (Baby Shower) कार्यक्रमातील व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, हा 'बेबी शॉवर' कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे. हा कार्यक्रम जवळचे मित्रमंडळी आणि प्रियजनांसाठी कुटुंबातील सदस्यांनी आयोजित केला आहे. ही अशीच एक घटना आहे, ज्यामध्ये कुटुंबातील अनेक लोकही दिसतात. या सोबतच सर्व नातेवाईकांनाही बोलावण्यात आले आहे. या दरम्यान, महिला तिच्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ अतिशय खास आहे कारण त्यात गर्भवती महिला नाचत आहे आणि ती खूप आनंदी दिसत आहे. यावेळी मुलाचे वडील म्हणजेच महिलेचा नवराही स्टेप बाय स्टेप तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. बॅकग्राउंडमध्ये 'तू मान मेरी जान' या गाण्यावर डान्स केला आहे. या दरम्यान दोघेही येणाऱ्या मुलाची वाट पाहत खूप आनंदी दिसत आहेत. हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही पुष्टी नाही, मात्र हा व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये महिला पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. या दरम्यान तेथे उभे असलेले पाहुणे या नृत्याचा आनंद घेत आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत.

Web Title: viral video pregnant woman dances to maan meri jaan baby shower netizens reactions