VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:11 IST2025-12-01T16:11:23+5:302025-12-01T16:11:48+5:30
व्लॉगरचा प्रश्न विचारण्याची शैली आणि उत्तर ऐकल्यानंतरची झालेली फजिती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
Pakistani Vlogger In Russia : सोशल मीडियावर सध्या एका पाकिस्तानी व्लॉगरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रूसच्या मॉस्को शहरात फिरत असताना या व्लॉगरने तीन रशियन तरुणींना एक साधा प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नाच्या उत्तराने केवळ व्लॉगरलाच नाही, तर व्हिडीओ पाहणाऱ्या लाखो लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्लॉगरची झालेली फजिती पाहून भारतीय नेटकरी मात्र खूपच खुश झाले आहेत.
पाकिस्तानी व्लॉगरने काय प्रश्न विचारला?
अली डोगर नावाचा पाकिस्तानी व्लॉगर मॉस्कोच्या रेड स्क्वेअरजवळ तीन रशियन तरुणींशी बोलत होता. अगदी सहज आणि हलक्या-फुलक्या गप्पा मारत असताना त्याने तिघींना एक प्रश्न विचारला. व्लॉगर म्हणाला की, "जर तुम्हाला पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या तीनपैकी कोणत्याही एका देशाच्या मुलाशी लग्न करायचे असेल, तर तुम्ही कुणाला निवडाल?"
तिघींनी उत्तर देताच व्लॉगरची बोलती बंद!
व्लॉगरचा प्रश्न ऐकताच रशियन तरुणींनी क्षणाचाही विलंब न करता जे उत्तर दिले, ते उत्तर ऐकल्यानंतर व्लॉगरचा चेहरा पाहण्यासारखा होता. तिन्ही मुलींनी एक सेकंदही न घालवता एकाच सुरात उत्तर दिले - "भारत!"
A Pakistani vlogger asks 3 Russian girls who would they marry if given an option between Indian, Pakistani & Bangladeshi, and all the 3 Russian girls choose India pic.twitter.com/PiyJ0Pvfbv
— Lord Immy Kant (@KantInEastt) November 30, 2025
या तिघींचे 'भारत' हे उत्तर इतक्या वेगाने आले की, पाकिस्तानी व्लॉगरला क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळेना. तो आपला कॅमेराकडे बघत खुदकन हसला. थोड्या वेळाने तो कॅमेऱ्याकडे पाहून थट्टेच्या सुरात म्हणाला, "घ्या भावांनो! भारतीय भाई लोक खूश व्हा! मी तर पाकिस्तानचा आहे. तरीही पाकिस्तान आणि बांगलादेशच्या भावांनी नाराज होऊ नका!"
व्हिडीओ व्हायरल का झाला?
या व्हिडीओमध्ये तिन्ही मुलींनी एकाच वेळी आणि एकाच सुरात 'भारत' असे उत्तर दिल्याने व्हिडीओ खूपच रंजक बनला आहे. रशियन तरुणींच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांनी त्वरित दिलेली प्रतिक्रिया सांगते की, त्यांना भारतीय संस्कृती आणि येथील लोकांचे व्यक्तिमत्त्व किती आकर्षित करते. अनेक युजर्सने कमेंट केले की, भारताचे रशियासोबतचे दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आणि जगभरात भारतीयांनी जपलेली चांगली प्रतिमा यामुळे हा प्रतिसाद मिळाला आहे.
व्लॉगरचा प्रश्न विचारण्याची आणि उत्तर ऐकल्यानंतरची झालेली फजिती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाखों वेळा पाहिला गेला असून, यावर भारतीय आणि पाकिस्तानी नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत आहेत.