Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:41 IST2025-06-24T19:40:57+5:302025-06-24T19:41:46+5:30
सोशल मीडियावरचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहे. एका ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून इंटरनेटवरील लोक म्हणत आहेत की, 'असे फक्त पाकिस्तानातच होऊ शकते.' या व्हिडिओमध्ये एक पूर्ण कुटुंब एकाच बाईकवरून प्रवास करताना दिसत आहे, पण सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या बाईकला लावलेली 'देसी जुगाड ट्रॉली, ज्यात तब्बल सहा मुलांना बसवण्यात आले आहे.
हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असल्याचे सांगितले जात आहे. एका ऑटोमध्ये बसलेल्या प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, बाईकवर चालकासह दोन महिला आणि एक लहान मूल, असे एकूण चार जण बसले आहेत. विशेष म्हणजे, या कुटुंबाने आपल्या बाईकच्या मागे एका ट्रॉलीसारखा 'देसी जुगाड' जोडला आहे, ज्यात घरातील इतर सहा मुलांना बसवण्यात आले आहे. म्हणजेच, एकूण दहा लोक एकाच बाईकवरून प्रवास करत आहेत.
पाकिस्तानी व्यक्तीच्या या धोकादायक 'देसी जुगाडा'च्या व्हिडिओवरून सोशल मीडिया यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांना हा व्हिडिओ मनोरंजक वाटत आहे, तर दुसरीकडे हे वाहतूक नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचेही म्हटले जात आहे. असे करून हे लोक केवळ आपला जीव धोक्यात घालत नाहीत, तर इतरांसाठीही धोका निर्माण करत आहेत.
लोकांनी म्हटले 'मौत का जुगाड'!
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'soo_funny_memes' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक धडाधड कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'अशा आई-वडिलांना थेट तुरुंगात पाठवले पाहिजे. ते मुलांच्या जीवाशी खेळत आहेत.' दुसऱ्या एका यूजरने म्हटले, 'असे दृश्य फक्त पाकिस्तानातच दिसेल.' आणखी एका यूजरने तर याला 'मौत का जुगाड' असे म्हटले आहे.